Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

श्रीक्षेत्र जेजुरी क-हा नदीच्या पठारावरील कुलस्वामी खंडेरायाची राजधानी, या क्षेत्राच्या अवतीभोवती अनेक तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन स्थळे आहेत, त्यांना भेट दिल्याशिवाय जेजुरी यात्रा संपूर्ण कशी होणार ?  म्हणून श्रीक्षेत्र जेजुरी पंचक्रोशीतील महत्वपूर्ण स्थळांची थोडक्यात परंतु परिपूर्ण माहिती...


कुलस्वामी खंडोबा

भगवान श्रीशंकराने खंडोबा अवतार घेऊन भूतलावरील मणी मल्ल दैत्यांचे संकट दूर केले आणि भूलोक भयमुक्त केले. कुलस्वामी खंडोबाविषयी जाणून घेण्याची प्रत्येक मराठी जनांची उत्सुकता असते. पौराणिक किंवा ऐतिहासिक काळातील उपलब्ध साहित्यावरून (मार्तंडविजय ग्रंथ , मल्हारी महात्म्य आदी...) श्रीमार्तंडभैरव कथासार, पूजा प्रतीके, श्रीमल्हार स्थाने यांच्याविषयी थोडक्यात घेतलेला आढावा.......

ll येळकोट येळकोट जयमल्हार ll


जेजुरगड

नाम जेजुरगड सुंदर
जेथे नांदतो म्हाळसावर
असे
भैरव अपार
पूर्ण अवतार शिवाचा ll

नील अश्वावरी स्वार
हाती घेउनी तलवार
करुनी मणीमल्ल संहार
करी उद्धार जगाचा ll

चंपाषष्ठीचा उत्सव भोर
यात्रा भरती अपार
येळकोट नामाचा गजर
भक्त आनंदे करतिया ll

दास म्हणेजी रामराव
राम तोचि खंडेराव
जेथे देव तेथे भाव
लक्ष पाहि
जडलिया ll


सण - यात्रा - उत्सव

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये सर्वसाधारणपणे वर्षामध्ये सात ते आठ यात्रा भरतात,या व्यतिरिक्त काही खास उत्सव हि साजरे केले जातात.जुन्या ग्रंथांमधून जेजुरीमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे होत असल्याचा उल्लेख सापडतो परंतु त्यातील वैशाखातील हिंदोळा व फाल्गुनातील टिपरी सारखे उत्सव कालौघात बंद पडले तर काही अजूनही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.

चैत्र पौर्णिमा

गणपूजा

विजयादशमी

चंपाषष्ठी

पौष पौर्णिमा

माघ पौर्णिमा

महाशिवरात्री

सोमवती अमावस्या

गुरुपौर्णिमा


जेजुरगड

जेजुरगड श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्यानंतर त्याने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्लाचे नाव घेतले जाते तर मणीसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊया.

श्रीक्षेत्र जेजुरी

श्रीक्षेत्र जेजुरी, तीर्थक्षेत्र आणि पर्यटनक्षेत्र म्हणून आवश्यक संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ उदा. रेल्वेचे वेळापत्रक, दळणवळण सुविधा, सुविधा, राहण्याची व्यवस्था, कुलाचाराची व्यवस्था इ. संपूर्ण माहिती.

महाराष्ट्रातील अनेक चांगल्या वाईट घटनांची साक्षीदार असलेली जेजुरनगरी, श्रीमल्हारी मार्तंडाची राजधानी, इथल्या मातीत अनेक धुरंधर घडले, कित्येक लढले आणि कित्येक पडले सर्वकाही याभूमीने पहिले. या नगरी संदर्भामध्ये उपलब्ध असणा-या पुराव्यांवरून घेतलेला आढावा.


अतिथी देवो भवः 
आपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Displaying all 2 comments

मल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सवातील कुळधर्म कुलाचार

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्ण धर्म ।।
ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म ।
त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।
--
संत मध्वमुनीश्वर

श्रीमल्हारी मार्तंड षडःरात्रोत्सव अर्थात चंपाषष्ठी उत्सव रविवार, दिनांक //२०१ रोजी सुरु होत आहे. अश्विन महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या कुलस्वामिनी देवीचे नवरात्र असते, त्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये, कुलस्वामी खंडोबाचे षडःरात्र असते, बोलीभाषेमध्ये याला श्रीखंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. या उत्सवाविषयी "मार्तंड विजय" ग्रंथामध्ये पार्श्वभूमी सांगितली आहे ती थोडक्यात अशी 'उन्मत्त झालेल्या मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला व त्यांना युद्धासाठी आव्हान दिले. त्यावेळी सप्तऋषींनी मार्तंड भैरवाच्या विजयासाठी प्रतिष्ठाण स्थापण केले व जसे जसे देवसेनेला विजय मिळू लागला त्या समयी स्थापित केलेल्या प्रतिष्ठाणवर विजयमाला चढू लागल्या, सहा दिवस चाललेल्या या युद्धामध्ये सहाव्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त झाल्यानंतर प्रतिष्ठाण विसर्जित करण्यात आले. याच प्रतिष्ठाणचा विधी आपण षडःरात्रोत्सव स्वरूपामध्ये साजरा करीत असतो.

श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये षडःरात्रोत्सव कालावधीत विविध प्रकारच्या पूजा आणि कुलाचार केले जातात. यामध्ये

 • पंचामृत अभिषेक,
 • भंडारपुजा,
 • दहीभात पुजा,
 • वस्त्रालंकार पुजा,
 • पुष्पपुजा,
 • तैलस्नान (तेलवण)
 • जागरण, गोंधळ, लंगर,
 • नैवेद्य
 • आणि अन्नदान

दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी श्रीमार्तंड भैरव अवतार झाला, त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ( एक वेळ आहार, गोड आहार, तिखट आहार किंवा फलाहार ) आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.

 • मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा,

          (रविवार,दिनांक //२०१)     

आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे. नंदादीप घासून  पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी.

 • मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया ते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

          (सोमवार दिनांक १३//२०१ ते बुधवार दिनांक //२०१)

रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी देवाला गोड नैवेद्य दाखवावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे,

 • मार्गशीर्ष शुद्ध पंचमी

         (बुधवार दिनांक //२०१)

श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.

          (गुरुवार, दिनांक //२०१ )

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.
देवघरातील सर्व देवतांच्या मूर्तींची पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी, चाफ्याची फुले देवाला अर्पण करावीत. घटावर फुलांची माळ लावावी.दिवटी प्रज्वलीत करून देवांना ओवाळावी. पुरणा - वरणाचा नैवेद्य आणि त्यासोबत भरित रोडग्याचा नैवेद्य देवाला दाखवावा, घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास द्यावा. घटोत्थापन करून आप्तेष्ठांना सोबत घेऊन तळीभंडार करावा, उपस्थितांना भंडार लावून पानसुपारी खोबरे द्यावे.


तळीभंडार

तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे.....

ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास होतोच....
प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये विजयादशमी ( दसरा ) व चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो.
तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या
आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच तळी भंडा हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर केला जाणारा विधी व मंदिरामध्ये केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून देवापाशी आनंद मागितला जातो.

खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार असा वाढत जावा तर दुसरे असे की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य नाही म्हणून खोबरे उधळले जाते  सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने केलेला विधी  महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक देवाला पोहोचते 

घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी

ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने, सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते.एक विडा देवासमोर मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.


स्वच्छ विस्तीर्ण पात्र असावे l त्यामाजी अष्टदळ काढावे l
भंडारे पूरित करावे l मध्ये कलश स्थापिजे ll
नागवेलीदळेकरून l कलश सुशोभित करावा जाण l
कलशात पूर्णपात्र नारळ ठेवून l तळीकेचे पूजन करावे ll
मुष्टीभंडार आत ठेवावा l आप्त परकीय समुदाय मेळवावा l
येळकोट नामाचा उच्चार करावा l एकावच्छेदे करुनिया ll
तळी उचलून आधारपात्रावर ठेविजे l मग भंडार सर्वांस लाविजे l
प्रसाद सर्वांस वाटीजे l अत्यादरेकरुनिया ll
तळी भरावयाचे समयी l दीपिका करी असावी l
मग तळी पुन्हा उचलावी l मस्तकी धारण कीजे ll

 

------- तळीभंडार ---------

हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......

अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........
मल्लारी जगतानाथम, त्रिपुरारी जगतगुरू l 
मणी विघ्नं म्हाळसाकांतम, वंदेहं कुलदैवतं ll 
प्रतिवर्षीप्रमाणे मार्तंड भैरव षडःरात्रोत्सव अर्थात कुलस्वामी खंडोबाचे षडःरात्र ज्याला बोली भाषेमध्ये खंडोबाचे नवरात्र किंवा चंपाषष्ठी उत्सव म्हणतात तो रविवार दिनांक //२०१ रोजी घटस्थापना करून सुरु होत आहे. श्रीमल्हारी मार्तंडाच्या उपासनेतील परमोच्च आनंद देणारा चंपाषष्ठी उत्सव गुरुवार, दिनांक //२०१ रोजी घटोत्थापणा करून होत आहे. 
षडःरात्रोत्सवातील कुलाचाराविषयी www.jejuri.in या संकेतस्थळावर याची विस्तृत पणे माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त कुलाचाराविषयी आपणास काही शंका असल्यास भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. आपल्या घरातील वातावरण मंगलमय, आनंददायी आणि आपल्या जीवनातील अडचणी, संकटे यांच्यावर मात करण्यासाठी या कालावधीमध्ये कुलाचार करावेत असे संत वचन आहे. श्रीक्षेत्र जेजुरीमध्ये 
 • संपूर्ण कुलाचार पुजा
 • प्रतिदिन क्षिराभिषेक  
 • पंचामृत अभिषेक
 • भंडारपुजा
 • दहीभात पुजा
 • वस्त्रालंकार पुजा
 • पुष्पपुजा,
 • दवणा पूजा 
 • तैलस्नान (तेलवण) 
 • शाश्वत पूजा 
 • जागरणगोंधळलंगर
 • नैवेद्य 
 • मल्हार याग 
 • अन्नदान 
 • सवाष्ण ब्राम्हण भोज 
 • कुमार कुमारिका भोज 
असे धार्मिक विधी केले जातात. आपणासाठी व आपल्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या इच्छाशक्तीप्रमणे शास्त्रोक्त मार्गाने आपले नाव, गोत्र, देशकाल उच्चारासाहित आपल्या कुटुंबियांच्या वतीने संकल्प सोडून हे विधी केले जातात. 
आपण आपल्या इच्छाशक्ती प्रमाणे आपली दक्षिणा मनीऑर्डरद्वारे, धनादेशाद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारेअथवा संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवू शकता. आपण पत्र, इमेल अथवा दूरभाष (टेलीफोन) वर संपर्क साधून आपणास करावयाचे कुलाचार विधी कळवावेतकाही अडचणी असतील तरी निसंकोचपणे कळवाव्यातमनामध्ये संदेह नसावा. षडःरात्रोत्सवनंतर आपणांस मल्हारी मार्तंडचा कृपाशीर्वादरूपी भंडार प्रसाद पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.
घरातील सर्वांवर कुलस्वामी खंडोबाचा कृपा प्रसाद आशिर्वाद !!!
बहुत काय लिहिणे, हे कार्य घडावे ही श्रींची इच्छा......
सेवेचे ठायी तत्पर...... जयमल्हार........ 
शुभम भवतु.....
---------
उपाध्ये गुरूजी, जेजुरी. 
+91 9850150797

Bookmark and Share