खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
जेजुरगड
नाम जेजुरगड सुंदर
जेथे नांदतो म्हाळसावर
असे भैरव अपार
पूर्ण अवतार शिवाचा ll
नील अश्वावरी स्वार
हाती घेउनी तलवार
करुनी मणीमल्ल संहार
करी उद्धार जगाचा ll
चंपाषष्ठीचा उत्सव भोर
यात्रा भरती अपार
येळकोट नामाचा गजर
भक्त आनंदे करतिया ll
दास म्हणेजी रामराव
राम तोचि खंडेराव
जेथे देव तेथे भाव
लक्ष पाहि जडलिया ll
देवा तुझी सोन्याची जेजुरी
शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून
येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे अनेकांनी, अगदी राजापासून
रंकापर्यंत सर्वांनी साकडे घातले आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर
प्रत्येकाने आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे जेजुरगडाचे वैभव वाढविण्यामध्ये
हातभार लावला. उंचच्या उंच दीपमाळा भव्य दिव्य कमानी आणि लांब-रुंद पाय-या
हे सर्व पाहिल्यानंतर कोणा एका लोकगीतकाराने त्याच्या डोळ्यासमोर दिसलेल्या
जेजुरीचे वर्णन आपल्या शब्दात मांडले........
देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नवलाख पायरी
जिथे नांदतो मल्हारी...
किल्ले पुरंदर
वीर मुरारबाजी देशपांडे यांनी आपल्या पराक्रमाने अजरामर केलेल्या या किल्ल्यावर बिनी दरवाजातून पुढे प्रवेश करताक्षणीच त्यांचा भव्य असा पुतळा दिसतो.पुरंदर व रुद्रमाळ किंवा वज्रगड हे डोंगराच्या एकाच सोंडेवर असले तरी दोन स्वतंत्र किल्ले आहेत. छत्रपती संभाजीराजांचा व सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे,किल्ल्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
निसर्ग संपदा
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
श्रीखंडोबा आरती
जेजुरगड पर्वत शिव लिंगाकार
मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर
नाना परीची रचना रचिली अपार
जळी स्थळी नांदे स्वामी शंकर ll १ ll
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ll धृ ll
मणी मल्ल दैत्य प्रबळ जाहला
येवूनी त्याने प्रलय मांडीला
न आटोपे कोणा स्मरणे मातला
देव गण गंधर्व कापती त्याला ll २ ll
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ll धृ ll
चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी
मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी
चरणी पृष्ठी खडगे वर्मी स्थापिसी
अंती वर देवूनिया मुक्तीसी नेसी ll ३ ll
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ll धृ ll
मणी मल्ल दैत्य नामे मल्हारी
देवा संकट पडले आहे जेजुरी
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी
देवा ठाव माझे दास नरहरी ll ४ ll
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा अरी मर्दन मल्लारी तुझी प्रचंडा ll धृ ll
-----
नरहरी सोनार
२
खंडा मंडित दंडित दानव अवळीला
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll १ ll
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा
नाना नामे गाईल हि तुमची सेवा
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll २ ll
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला
तो हा मल्लांतक अवतार झाला
यालागी आवडे भावे वर्णिला
रामी रामदास जिवलग भेटला
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी ll ३ ll
----
रामदास स्वामी
३
हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।।
कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला ।
बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।।
जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।।
चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म ।
त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।।
ज्यांनान कळे तुझ्या भक्तीचे वर्म ।
त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।।
जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडार रानें डवडवली काया ।।धृ ।।
तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव ।
जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।।
मध्वनाथ जपतो येळकोट भैरव ।
निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।।
जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।
----
मध्वमुनीश्वर
जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥
मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥
मातले पृथ्वीवरि । आणि मल्ल दैत्य दोनी ॥
टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥
म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥
साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ॥
जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ॥
शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ॥ जय. ॥ २ ॥
त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ॥
मारिले खङ्ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ॥
वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ॥ जय. ॥ ३ ॥
मल्ल म्हणे कर्पूरगौरा । हरहर महादेवा मल्हारी जनमुखिं ॥
ऎसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें ।
म्हणुनीं मल्लारी नांवा । जय. ॥ ४ ॥
चंपाषष्ठीचे दिवशी । ऎसा अवतार झाला ॥
आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ॥
चरणी तुझे लीन नामा ॥ देवा सांभाळी त्याला ॥ जय देवा. ॥ ५ ॥
----
नामा परीट------------------------------------------------------------------------
५जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥
आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥
देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।
तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥
उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार ।
भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥
स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ॥
अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ॥
अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ॥
निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ॥ जय. ॥ २ ॥
निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व ।
अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।
तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ॥
मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ॥ जय देवा. ॥ ३ ॥
---
मौनीनाथ महाराज
---------------------------------------------------
मल्हारी ध्यान
ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरीनिभं म्हाळसा भूषितांकम l
श्वेताश्वम् खडःग हस्तं विबुधबुधगणै सेव्यमानं कृतार्थे l
युक्तांघ्रि दैत्यमुन्ध्री डमरु विलसितं नैशचूर्णाभिरामम l
नित्यं भक्तेषु तुष्टं श्वगण परिवृत्तं नित्यमोङ्काररूपम् ll
- अर्थ -
ज्याचा वर्ण सुवर्ण आहे, म्हाळसेने ज्याची मांडी भूषित केली आहे, ज्याचा घोडा पांढऱ्या रंगाचा आहे, ज्याच्या हातांत खड्ग आहे, शहाणे लोक ज्याची सेवा करण्यांत स्वतःला कृतार्थ समजतात अशा मल्लारी देवाचे नित्य ध्यान करावे. दैत्याच्या मस्तकावर ज्याने पाय ठेवलेला आहे, त्याच्या एका हातांत डमरू विलसत आहे, हरिद्राचूर्णामुळे तो सुंदर दिसतो आहे, ज्याच्या बरोबर कुत्रे आहे आणि भक्तांवर त्याची नित्य कृपाच असते, असा हा मल्हारी देव नित्य ओंकाररूपच होय.
श्रीमल्हारि म्हाळसाकांत प्रातःस्मरणं
प्रातःस्मरामि भावभीतिहरं सुरेशं I
मल्हारिमिन्द्रकमलानन विश्ववंद्यम् I
श्रीम्हाळसावदन शोभितवामभागं I
मल्हारिदेवमनघं पुरुषं वसन्तम् II १ II
प्रातर्भजामि मणिमल्लजरुंडमालं I
माणिक्यदीप्ति शरदोज्वलदन्तपंक्तिम् I
रत्नैर्महामुगुटमण्डितमष्टमूर्तिम् I
सन्तप्तहेमनिभगौर शरीरपुष्टम् II २ II
प्रातर्नमामि फ़णिकज्जल मुक्तदीपम् I
चन्द्रार्ककुण्डल सुशोभित कर्णयुग्मम् I
सत्पात्र खड्ग डमरूच त्रिशूल हस्तं I
खण्डेन्दुशेखर निभं शशिसूर्यनेत्रम् II ३ II
इदं पुण्यमयं स्तोत्रं मल्हारेर्यपठेन्नरः I
प्रातः प्रातः समुत्थाय सर्वत्र विजयी भवेत् II ४ II
II इति श्रीमल्हारि म्हाळसाकांत प्रातःस्मरणं II
मराठी अर्थ:
मी सकाळी सकाळी या भवसागरांतील भयाचे हरण करणाऱ्या शंकराचे स्मरण करतो. त्या विश्ववंद्य असलेल्या मल्हारीचे स्मरण करतो. श्रीम्हाळसा या आपल्या पत्नीच्यामुळे त्याच्या शरीराचा डावा भाग शोभून दिसत आहे, देवांना भयमुक्त करणाऱ्या सर्व पुरुषामध्ये श्रेष्ट (वसंत) अशा श्रीमल्हारीचे स्मरण करतो. मी सकाळी मणी व मल्ल या दैत्यांच्या रुंडमाला पायदळी असलेल्या श्रीमल्हारीचे भजन करतो. माणीक्याच्या तेजाने दैदिप्यमान अशी दीप्ती व पांढरीशुभ्र दंतपंक्ति व रत्नांनी मढविलेला मुकुट धारण केलेली मूर्ती व संतप्त (मणी-मल्ल दैत्यांमुळे) झाल्यामुळे हेमनिभगौर झालेले पुष्ट शरीर असलेल्या श्रीमल्हारीचे भजन करतो. मी सकाळी सकाळी या रवी-चंद्र हे कर्णकुंडले असलेल्या, हातांत खड्ग, डमरू व त्रिशूल आणि जणू रवी व चंद्र हेच डोळे असलेल्या श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे स्मरण करतो. असे हे श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे पुण्यमय स्तोत्र सकाळी सकाळी जो म्हणेल तो सर्वत्र विजयी होईल. अशा रीतीने हे श्री मल्हारी- म्हाळसाकांताचे प्रातःस्मरण त्यालाच अर्पण करू.
मल्हारी षडःन्यास
ॐ मल्लारये अंगुष्ठाभ्यां नमः ll
ॐ म्हाळसानाथाय तर्जनीभ्यां नमः ll
ॐ मेंग नाथाय मध्यमाभ्यां नमः ll
ॐ महिपतये अनामिकाभ्यां नमः ll
ॐ मैराळाय कनिष्ठाभ्यां नमः ll
ॐ खड्गराजाय करतलपृष्ठाभ्यां नमः ll
एक श्लोकी मल्हारी महात्म्य
ll एक श्लोकी मल्हारी महात्म्य ll
पूर्वं धर्मसुतास्तपोवनगता मल्लेन संतर्जिता
जिष्णुंविष्णुमतीत्य शंभुमभजन् तेनावतीर्य क्षितौ
तत्रोल्का मुखमुख्य दैत्य निवहं हत्वामणिं मल्लकं
देवः प्रेमपुरेSर्थीतोSवतु वसन् लिङ्गं द्वयात्माSर्थदः ll
मल्हारी कवच
अस्यश्रीमल्लारीकवचमंत्रस्य l स्कंदऋषिः l
श्रीमल्हारीदेवता l अनुष्ठुपछंदःl श्रीमल्लारीकवचजपेविनियोगःll
सनत्कुमार उवाच l
मुनीनां सप्तकोटीनां l वरदं भक्तवत्सलम l
दुष्ट मर्दन देवेशं l वंदेहं म्हाळसापतिम ll
अनुग्रहाय देवानां l मणिरत्नगिरौस्थितं l
प्रसन्नवदनं नित्यं l वंदेहं मल्ल वैरिणं ll
सर्वदेवमयं शांत l कौमारं करुणाकरं l
आदिरुद्र महारुद्र l वंदेहं सवित्वकप्रियम ll
भुक्तीमुक्ती प्रदं देवं l सर्वाभरणभूषितं ll
कोटिसूर्यप्रतीकाशं l वंदेहं असुरांतकं ll
आदिदेवं महादेवं l मल्लारी परमेश्वरम l
वीरस्त्वस्त्याविरुपाक्षं l वंदेहं भक्तवत्सलं ll
भोगरूपपरं ज्योतिः l शिरोमाला विभूषितं l
त्रिशलादिधरं देवं l वंदेहं लोकरक्षकं ll
इदं पठति यो भक्त्या l मल्लारी प्रतिकारकं l
भक्तानां वरदं नित्यं l प्रणतोस्मिमहेश्वरं ll
वने रणे महादुर्गे l राजचौर भयोप्युत l
शाकिनीडाकिनीभूत l पिशाचोरगराक्षसःl
ग्रहपिडासु रोगेषु l विषसर्पभयेषुच ll
सदा मल्लारीमल्लारी l मल्लारीतिकीर्तनं l
सप्तजन्मकृतं पापं l तत्क्षणादेव नश्यति ll
त्रिकालेतु पठे नित्यं l विष्णू लोकंस गच्छंती l
देहांतेतु तप्राप्नोती l सर्व लोके महीयते ll
इति श्रीब्रह्मांडपुराणे l क्षेत्रखंडे मल्लारीमहात्मे l मल्लारीकवचं संपूर्णम ll
मल्लारी सप्तक
मलूराया तवशरणं l मलूनाथा तवशरणं l
त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालका तवशरणं ll १ ll
शाश्वतमुर्ते तवशरणं l पितसुंदरा तवशरणं l
पंचानना हयवाहना शेषभूषणा तवशरणं ll २ ll
चतुर्भुजमुर्ते तवशरणं l लिंगस्वरूपेण तवशरणं l
खड्गखंडा, त्रिशूळ, डमरू, पूर्णपात्रे तवशरणं ll ३ ll
करुणानिधी तवशरणं l करुणासागरा तवशरणं l
श्रीमैलारा, शिवमैलारा, खड्गधरा तवशरणं ll ४ ll
म्हाळसानाथा तवशरणं l बाणाईनाथा तवशरणं l
जयाद्रीनाथा, पेंबरनाथा, मणीचूलनाथा तवशरणं ll ५ ll
कृपामुर्ते तवशरणं । कृपासागरा तवशरणं ।
कृपाकटाक्षा, कृपावलोकना कृपानिधे प्रभू तवशरणं ll ६ ll
भक्तपालका तवशरणं l भक्तरक्षका तवशरणं l
भक्तवत्सला भक्तोदधारा भक्तदयाळा तवशरणं ll ७ ll
॥ॐ त्र्यंबकाय नमः॥ ॥ॐ महादेवाय नमः॥ ॥ॐ जदीश्वराय नमः॥॥ॐ त्रिपुरारये नमः॥ ॥ॐ जटाजूटाय नमः॥ ॥ॐचंदनभूषणाय नमः॥ ॥ॐ चंद्रशेखराय नमः॥ ॥ॐ गौरी प्राणेश्वराय नमः॥ ॥ॐ जगन्नाथाय नमः॥ ॥ॐ महारूद्राय नमः॥ ॥ॐ भक्तवत्सलाय नमः॥ ॥ॐ शिववरदमूर्तये नमः॥ ॥ॐ गिरीजापतये नमः॥ ॥ॐ पशुपतये नमः॥ ॥ॐ कौर्पूरगौराय नमः॥ ॥ॐ शंकराय नमः॥ ॥ॐ सर्पभूषणाय नमः॥ ॥ॐ असूरमर्दनाय नमः॥ ॥ॐ ज्ञानदाकाय नमः॥ ॥ॐ त्रिमूर्तये नमः॥ ॥ॐ शिवाय नमः॥ ॥ॐ मार्तंडभैरवाय नमः॥ ॥ॐ नागेंद्रभूषणाय नमः॥ ॥ॐ नीलकंठाय नमः॥ ॥ॐचंद्रमौलये नमः॥ ॥ॐलोकपालाय नमः॥ ॥ॐ देवेंद्राय नमः॥ ॥ॐ नीलग्रीवाय नमः॥ ॥ॐ शशांकचिन्हा नमः॥ ॥ॐ वासुकीभूषणाय नमः॥ ॥ॐदुष्टमर्दनदेवेशाय नमः॥ ॥ॐउमावराय नमः॥ ॥ॐ खङ्गराजाय नमः॥ ॥ॐ मृडानीवराय नमः॥ ॥ॐ पिनाकपाणये नमः॥ ॥ॐ दशवक्त्राय नमः॥ ॥ॐ निर्विकाराय नमः॥ ॥ॐ शूलपाणये नमः॥ ॥ॐजगदीशाय नमः॥ ॥ॐ त्रिपुरहराय नमः॥ ॥ॐ हिमनगजामाताय नमः॥ ॥ॐ खङ्गपाणये नमः॥ ॥ॐव्योमकेशाय नमः॥ ॥ॐत्रिशूलधारये नमः॥ ॥ॐ धूर्जटये नमः॥ ॥ॐत्रितापशामकाय नमः॥ ॥ॐअनंगदहनाय नमः॥ ॥ॐ गंगाप्रियाय नमः॥ ॥ॐ शशिशेखराय नमः॥ ॥ॐ वृषभध्वजाय नमः॥ ॥ॐ प्रेतासनाय नमः॥ ॥ॐचपलखङ्गधारणाय नमः॥ ॥ॐकल्मषदहनाय नमः॥ ॥ॐ रणभैरवाय नमः॥ |
॥ॐ खङ्गधराय नमः॥ ॥ॐ रजनीश्वराय नमः॥ ॥ॐ त्रिशूलहस्ताय नमः॥ ॥ॐ सदाशिवाय नमः॥ ॥ॐकैलासपतये नमः॥ ॥ॐपार्वतीवल्लभाय नमः॥ ॥ॐ गंगाधराय नमः॥ ॥ॐ निराकाराय नमः॥ ॥ॐ महेश्वराय नमः॥ ॥ॐ वीररूपाय नमः॥ ॥ॐ भुजंगनाथाय नमः॥ ॥ॐ पंचाननाय नमः॥ ॥ॐ दंभोलिधराय नमः॥ ॥ॐ मल्लांतकाय नमः॥ ॥ॐ मणिसूदनाथ नमः॥ ॥ॐ असुरांतकाय नमः॥ ॥ॐ संग्रामवरीराय नमः॥ ॥ॐ वागीश्वराय नमः॥ ॥ॐ भक्तिप्रियाय नमः॥ ॥ॐ भैरवाय नमः॥ ॥ॐ भालचंद्राय नमः॥ ॥ॐ भस्मोद्धाराय नमः॥ ॥ॐ व्याघ्रांबराय नमः॥ ॥ॐ त्रितापहाराय नमः॥ ॥ॐभूतभव्यत्रिनयनाय नमः॥ ॥ॐ दीनवत्सलाय नमः॥ ॥ॐ हयवाहनाय नमः॥ ॥ॐ अंधकध्वंसये नमः॥ ॥ॐ श्रीकंठाय नमः॥ ॥ॐ उदारधीराय नमः॥ ॥ॐमुनितापशमनाय नमः॥ ॥ॐ जाश्वनीळाय नमः॥ ॥ॐ गौरीशंकराय नमः॥ ॥ॐ भवमोचकाय नमः॥ ॥ॐ जगदुद्धाराय नमः॥ ॥ॐ शिवसांबाय नमः॥ ॥ॐ विषकंठभूषणाय नमः॥ ॥ॐमायाचालकाय नमः॥ ॥ॐपंचदशनेत्रकमलाय नमः॥ ॥ॐ दयार्णवाय नमः॥ ॥ॐ अमरेशाय नमः॥ ॥ॐ विश्वंभराय नमः॥ ॥ॐकालाग्निरूद्राय नमः॥ ॥ॐ मणिहराय नमः॥ ॥ॐ मालूखानाथ नमः॥ ॥ॐजटाजूटगंगाधराय नमः॥ ॥ॐ खंडेराय नमः॥ ॥ॐ हरिद्राप्रियरूद्राय नमः॥ ॥ॐ हयपतये नमः॥ ॥ॐ मैराळाय नमः॥ ॥ॐ मेघनाथाय नमः॥ ॥ॐअहिरूद्राय नमः॥ ॥ॐ म्हाळसाकांताय नमः॥ ॥ॐ मार्तंडाय नमः॥ |
भूपाळी
रात्रीचा अंतिम प्रहर व दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्याकाळामध्ये
सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूप रागामध्ये पद्य स्वरूपातील स्तुतीची
आळवणी करून जगविले जाते त्याला भूपाळी असे म्हणतात.पेशवाई मध्ये नामांकित
कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्धच आहेत त्यापैकीच "घनश्याम सुंदरा..." हि
होनाजी बाळाची भूपाळी सर्वांनाच माहित आहे त्यांचेच समकालीन शाहीर सगनभाऊ
यांनी रचलेले पद आजही खंडोबा मंदिरामध्ये भूपाळीच्या आरंभीच म्हंटले जाते.
श्रीक्षेत्र जेजुरी येथील मंदिरांमध्ये रोज पहाटे भूपाळी म्हंटली जाते,या
भूपाळीतील पदे वेगवेगळ्या कालावधीत( १८व्या / १९व्या शतकात ) वेगवेगळ्या
कवींनी (शाहीर सगनभाऊ, बापू वाघ्या, रामभाऊ, हरिभाऊ, नामा परीट इ.) रचलेली आहेत परंतु
ती कुठेही लिखित स्वरुपात नसल्याने ज्यांना ती मुखोदगत आहेत
त्यांच्याकडूनच ती ऐकायला मिळते. खास www.jejuri.in संकेतस्थळावर प्रथमच संकलित करून प्रसिद्ध करण्यात येत आहे.
१
काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन
सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान
भक्त अलभ्या ऋषी, स्मरावे दत्त हनुमान
२
३
४
उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी
उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी.
६
मल्हारी पंचाक्षरी
प्रभो तुम्ही जेजुरी च्या मल्हारी
तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll धृ ll
क क क क काय तुझे गुण वर्णावे दयाळा
ख ख ख ख खंड्याचा हात भला रे तुजला
ग ग ग ग गंग्या वारूवर स्वार रंग पिवळा
घ घ घ घ घटका सोन्याची जाते अमृत वेळा
न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी
तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll १ ll
च च च च चमकतो वारू देखिला नयनी
छ छ छ छ छाया कृपेची कर देवा येउनी
ज ज ज ज जाई जुईंचे हार गुंफित बैसुनी
झ झ झ झ झटकन देवा यावे त्वा धावूनी
य य य येऊन निजसव स स सांभाळ करी
तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll २ ll
ट ट ट ट टाण टोण्याचा धरा भंडारावरी
ठ ठ ठ ठ ठाण ठोकतो आहेस आमुच्या शिरी
ड ड ड ड डवहंकार करू नको गर्व धरू अंतरी
ढ ढ ढ ढ ढाल नामाची उभास भिंतीवरी
न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी
तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll ३ ll
मल्हारी करुणाष्टक
मल्हारी करुना करी मजवरी ताप त्रयाते हारी
तारी या भवसागरी मजसी या रंकासी हाती धरी
म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा
म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती
आस हि तुझी फार लागली, दे दया नी दे बुद्धी चांगली
देऊ तू नको दुष्ट वासना, तूची आवरी आमुच्या मना
वागवया सर्व सृष्टीला, शक्ती बा असे एक तुजला
सर्व शक्ती तू सर्व देखणा, कोण जाणतो तुझिया गुणा
माणसे आम्ही सर्व लेकरे, मायबाप तू हे असे खरे
तुझिया कृपेवीण ईश्वरा, आसरा आम्हा नाही दुसरा
म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा
म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती...
कडेपठार देवतालिंग स्तवन
आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll धृ ll
पदी घालूनी बळकट मिठी, पहावी शोधूनी अंतरदृष्टी,
प्रभूने रचला रचली सृष्टी
त्यामध्ये भक्त जनांच्या भेटी होती सत्संगा,
आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll १ ll
शिवशिव नामामृत रस सार सेवन करावे वारंवार,
जावे भवसागर उतरुनी पार
भुक्ती मुक्तींचे दरबार रंगले रंगा,
आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll २ ll
धरुनी हृदयांतरी विश्वास, करुनि षडःकर्मांचा नाश,
जावे भवबंधन तोडूनी पाश
जगदीश पुरवतील आस मिटवतील दंगा,
आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ३ ll
रामभाऊ सदा सेवाकरी महाली, गळयामध्ये घालूनिया भंडारी
उभा असे सद्गुरुनाथांचे द्वारी
कर जोडूनी मागतो वारी मिळूनी सत्संगा
आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ४ ll
सदानंदाचा यळकोट