Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभाशाली लखलखत्या हि-यांमुळे,अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.

 

Free FAQ Database from Bravenet Free FAQ Database from Bravenet.com

चंपाषष्ठी

चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासने तील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रो त्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावा मध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.

जेजुरी पर्यटन

श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजे पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. मंदिरे, तलाव व ऐतिहासिक वास्तू यांचा खजिनाच जेजुरी परिसरामध्ये पहावयास मिळतो त्याची हि झलक.........

 

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

क-हेचे पाणी

ब्रम्हकमंडलू मधून निर्मिती झालेल्या क-हेच्या पाण्याचा गोडवा काही न्याराच आहे स्वर्गातील अमृतकुंभ सुद्धा फिका पडावा अशी चव या पाण्याला आहे. भक्ती आणि शक्तीचे स्फुल्लिंग घडविणारा प्रदेश या पाण्यावर पोसला आहे. १०८ शिवमंदिरे, संत सोपानकाकांची समाधी, कुलस्वामी खंडेराया,भूस्वानंद मयुरेश्वर  अशी भक्तीरस असणारी महत्वपूर्ण तीर्थक्षेत्रे क-हेच्या तीरावर आहेत. तर शिल्पकलेचे दर्शन घडविणारी भुलेश्वर- पांडेश्वर सारखी मंदिरेही इथे आहेत. तर इतिहास घडविणारी शक्तीस्थळे हि इथे आहेत स्वराज्यासाठी  शिवाजीराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथम न्हाली ती इथेच, शीर धडावेगळे होऊनसुद्धा साडेसहाशे मोगलांना यमसदनी पाठविणारा योद्धा मुराबजीही इथेच धारातीर्थी पडला, स्वराज्याचा युवराज शंभूराजा आणि पेशवा सवाई माधवराव इथेच जन्मला. इतिहासातील बावन्न सरदार घराणी क-हेच्या पाण्यावर वाढली, पारतंत्र्यातील भारताला स्वातंत्र्याचा क्रांतिमार्ग दाखविणारा उमाजी नाईक इथेच घडला, जोतीराव फुलेंसारखा आद्य समाजसुधारक इथेच घडला, कवी मोरोपंत इथेच फुलले, शिवलीलामृत क-हेच्या तीरावरच रचले. शृंगाररस लिहिणारे शाहीर सगनभाऊ, होनाजी बाळा इथे घडले तर आपल्या लेखणीतून दिल्लीश्वरांनाही घाम फोडणारे आचार्य अत्रे इथेच घडले. किती वर्णावी याची गोडी ? किती सांगावी याची महती ? शब्दही अपुरे पडावेत असे आमुचे क-हेचे पाणी…


 

JEJURI - Golden City

JEJURI - Golden City
jejuri.in website is very useful and informative website, which have various type of information for tourist and devotees of Lord Khandoba.
Summery of jejuri.in website
JEJURI (18 o 16' N., 74 o 09' E.; ht. 2,273 ft.; a. 1 sq. mile; p. 3,036) in Taluka Purandar, Pune District, a station on the Southern Railway meter-gauge line between Pune and Bangalore and 32 miles from Pune, & 47 kilometers by road. Jejuri is a famous place of pilgrimage. It is more a village than a town and derives its importance from the religious fairs held in honour of the Lord Khandoba, who is also called Mhalsakant, Martand-Bahirav, Malhari, Mailar, Mallappa, Mallanna. It is situated on a high level and is surrounded on all sides by fertile and cultivated lands. 364 steps for climbing to Jejurgad (new down hill temple.) Approx. 250 Light Stands which is known as DEEPMALA and 14 arch ( Kamani) on the step side.
Khandoba has two temple at Jejuri, one older than the other, both built at the end of an outlying spur of the Purandar range which here sinks into the plain. The new one is larger and stands close to and about 250 feet above the village. The smaller temple, however, is believed to be more sacred. It is built on a small plateau called Kadepathar 3 kilometers off and about 400 feet higher. The old village site, now deserted, was to the east of the hill on which the new temple stands. Close to the south of the old village site is a reservoir, 37 acres in area, built by the last Pesava, Bajirav II (1796-1817), and called the Pesava's reservoir. It is round and encircled with a massive stone wall. On the N. W. of the new village a square stone reservoir called Holkar's Tank (Punyshlok Ahilyadevi Holkar Talav), of about 18 acres, was built about 1770 by Shri Ahilya Devi Holkar. Between this reservoir and the village stands a Chhatri built in memory of Malharrav Holkar. The chief object of worshipis a ling, behind which are statues of Malharrav and his two wives, all in Jaipur alabaster.
The plateau of Kadepathar is 11½ acres in extent, and, besides the older and more sacred temple of Khandoba it contains several other temples and shrines and houses.
The festivals are seven to eight in the year, named as Chaitr Pournima, Ganpuja, Vijayadashami (Dahehara), Champashashthi, Poush, Pournima, Magh Pournima, Somavati Amavasya.
Chaitra Pournima from the bright twelfth of the dark first of Caitra (March-April).
Ganpuja on first bright of Ashadh ( June - July )
Vijayadashmi (Dashehara): from the bright first to bright tenth of Ashwin ( October - November )
Champashashthi from the bright first to the bright seventh of Margasirsa (November-December);
Poush Pournima from the bright twelfth to the dark first (December-January); (3)
Magh Pournima from the bright twelfth to the dark first of Magh (January-February)
Somavati Amavsya No moon on Monday
Large fairs are held at the time of festivals and attract pilgrims from as far as Khandesh, Berar, and the Konkan.

-----

Upadhye Guruji. Jejuri.

upadhyeguruji@jejuri.in

upadhyeguruji@gmail.com

free statistics

भूवैकुंठ पंढरी । तशीच जेजूरी ।

कानडा विठ्ठल आणि कानडा मल्हारी ही दोन्ही दैवते म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा सांस्कृतिक अनुबंध, चैत्र-वैशाखात खंडोबाच्या विविध ठाण्यांच्या यात्रा-जत्रा सुरू असतात. यात्रा आणि जत्रेत एक प्रमुख फरक असतो. देवाला गोडाचं जेवण दाखवितात. कीर्तन सप्ताह आयोजित होतात त्या यात्रा आणि जेथे देवाचा सामिश नैवेद्य असतो आणि तमाशाचा फड रंगतो ती जत्रा! चैत्र-वैशाखात कानडया मल्हारीच्या जत्रा महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुरू असतात लागलीच आषाढात माऊलीच्या दुधासारख्या पर्जनधारा बरसू लागतात. आकाशात घननिळे अन्सावळया विठ्ठलाचे वेध त्याच काळात वारकर्‍यांना लागतात. पंढरीची यात्रा आषाढात अबिर गुलालांच्या राशीत रंगते. इकडे मल्हारीचा भंडारा आणि तिकडे विठ्ठलाचा गोपीचंद-बुका. मल्हारीचे निशान पिवळे तर विठ्ठलाचे निशान भगवे. मल्हारीचा लोकदैवत संप्रदाय तर विठ्ठलाचा भक्तीसंप्रदाय. विठ्ठल आणि मल्हारी म्हणजे खंडोबा यांची तुलना करणारे अतिशय सुंदर पद दगडूबाबा साळी यांनी रचले आहे. दगडूबाबा साळी कलगी पक्षाचे रचनाकार. ते स्वत: खंडोबाचे भक्त होते. यात्रा-जत्रांचा मोसम सुरू असताना दगडूबाबा साळी यांच्या या रचनेची प्रकर्षाने आठवण होते. ते पद पाहा-

भू वैकुंठ पंढरी । तशीच जेजूरी असे सांगती
तेथे राही रखुमाबाई । येथे बाणाई म्हाळसा सती।
तेथे बुक्याचे भूशण । येथे उधळण भंडार किती
तेथे पुंडलिक सगुण । येथे प्रधान हेगडेपती
तेथे भीमा चंद्र यात्रा । येथे कर्‍हा गंगा भक्तजन येती
तेथे टाळ, मृदुंग वीणा। येथे घण घणा धाटी गर्जती

या पदामधून महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदाय आणि लोकदैवत संप्रदाय यांचे अतिशय मनोहर दर्शन घडते. श्री विठ्ठलाच्या दिंडया-पालख्या आळंदीहून निघतात तेव्हा सासवड, जेजूरी मार्गेच पंढरीला जातात. जेजूरीला पालख्यांचा मुक्काम असतो तेथे रात्री टाळ-मृदुंगाचा गजर सुरू असतो आणि घोळ, कोटंबा, दिमडी घेतलेल्या वाघ्या-मुरळयांचे जागरण देखील रंगलेले असते. विठ्ठलाचा नामजागर आणि जागरण जेजूरीच रंगते. एका परीने हे 'हरी` आणि 'हर` यांचेच नामजागरण असते कारण 'हर` म्हणजे शंकर. शंकराचा अवतार खंडोबा या दोन्ही दैवतांची मोहिनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनमानसावर अद्यापही कायम आहे.

--

डॉ.प्रकाश खांडगे.

'महान्यूज'च्या सहकार्याने


 

 

 

 

 

 

जयमल्हार !!! आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.....

Bookmark and Share