Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

Loading...

Directions

श्रीक्षेत्र जेजुरीतील हवामानाचा अंदाज

आज, उद्या आणि परवा

भारतीय प्रमाण वेळ

जेजुरी पर्यटन

श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजे पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. मंदिरे, तलाव व ऐतिहासिक वास्तू यांचा खजिनाच जेजुरी परिसरामध्ये पहावयास मिळतो त्याची हि झलक.........

कला व संस्कृती

श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभा शाली अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.

अतिथी देवो भवः 
आपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Displaying all 2 comments

श्रीक्षेत्र जेजुरी, बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामी खंडेरायाची नगरी, समुद्र सपाटीपासून ६९२ मीटर उंचीवर व अक्षांश १८°२७' उत्तर व रेखांश  ७४°१६' पूर्व वर वसलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील एक उपरांग सिंहगडापासून पूर्वेकडे निघते व कात्रजच्या पुढे त्याचे दोन फाटे तयार होतात, त्यापकी उत्तरेकडील डोंगर रांगेवर मल्हारगड दौलत मंगळगड तर दक्षिणेकडील डोंगर रांगेवर पुरंदर,वज्रगड जेजुरगड आहेत. या दोन्ही डोंगर रांगेमधील पठारावरून क-हा नदीचा प्रवाह वाहतो त्यामुळे या परिसराला क-हेपठार असे म्हणतात. क-हा नदीच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर जेजुरी नगरीचा विस्तार आहे,
भगवान शंकराने, मार्तंड भैरव अवतार धारण करून भूतलावर पदार्पण केले ते या ठिकाणी आणि मणी व मल्ल दैत्य संहारानंतर सप्तऋषींच्या विनंती वरून आपली राजधानी स्थापन केली तीही याच ठिकाणी. जय मिळवून देणारा पर्वत म्हणून या पर्वताचे 'जयाद्री' नामकरण झाले, तर जयाद्री नगरी -> जयजय नगरी -> जेजेपुरी  -> जेजुरी अशा क्रमाने कालानुरूप बदल होत या नगरीला नाव प्राप्त झाले असे काही लोकगीतांमधून आढळते.

विठोबाचे अबीर, देवीचे कुंकू ज्योतीबाचे गुलाल तसे भंडारा हे मल्हारी मार्तंडाचे लेण असल्याने येथे त्याची मुक्त हस्ताने उधळण होत असते. हळदी चुर्णावर प्रक्रिया करून भंडाराची निर्मिती होते, त्याचा रंग पिवळा धमक अगदी सोन्यासारखा असल्याने त्याला येथे सोन्याची उपमा दिली आहे. सोमवती अमावस्या किंवा विजयादशमीला पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्त "सदानंदाचा येळकोट"च्या गजरात चोहोबाजूने भंडारा उधळतात तेव्हा संपूर्ण वातावरणाला सुवर्ण झळाळी प्राप्त होते आणि ते दृश्य पाहून प्रत्येकाच्या ओठी एकच वाक्य येते ते म्हणजे "देवा तुझी सोन्याची जेजुरी"

शतकानुशतके भाविक भक्तांच्या अडी अडचणीच्या वेळी धावून येणारे कुलदैवत म्हणून जेजुरीच्या खंडोबाकडे अनेकांनी, अगदी राजापासून रंकापर्यंत सर्वांनी साकडे घातले आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे जेजुरगडाचे वैभव वाढविण्यामध्ये हातभार लावला. उंचच्या उंच दीपमाळा भव्य दिव्य कमानी आणि लांब-रुंद पाय-या हे सर्व पाहिल्यानंतर कोणा एका लोकगीतकाराने त्याच्या डोळ्यासमोर दिसलेल्या जेजुरीचे वर्णन आपल्या शब्दात मांडले........

देवा तुझी सोन्याची जेजुरी
गडाला नवलाख पायरी
जिथे नांदतो मल्हारी...

तसेच तो पुढे म्हणतो

नवलाख पायरी गडाला, चिरा जोडील्या खडकाला...

पुणे-मिरज लोहमार्गावर पुण्यापासून ३८ किमी वर जेजुरी रेल्वे स्थानक आहे कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस,सह्याद्री एक्स्प्रेस व साध्या प्रवासी गाड्या जेजुरी रेल्वे स्थानकावर थांबतात.
रस्ता मार्गाने पुणे -जेजुरी अंतर ४७ किमी आहे,महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जेजुरी बस स्थानकावरून पुणे, मुंबई, बारामती, पंढरपूर, सातारा इत्यदी ठिकाणी येण्या जाण्यासाठी बस सेवा सतत असते.
देशांतर्गत हवाई प्रवासासाठी पुणे विमानतळ तर अंतरराष्ट्रीय प्रवासासाठी  मुंबई
येथील विमानतळ सोयीचे आहे.


श्रीक्षेत्र जेजुरी येथील ATM सुविधा

State Bank of India Axis Bank


भारतीय रेल्वे - जेजुरी रेल्वे स्थानक

वेळापत्रक

अ.क्र.

गाडी क्रमांक

गाडीचे नाव

पासून - पर्यंत

वेळ

थांबा

1

११०२४

सह्याद्री एक्स्प्रेस

कोल्हापूर -  मुंबई

०४:४५

२ मि.

2

५१४३६

पॅसेंजर

सातारा - पुणे

०६:४५

२ मि.

3

५१४१०

पॅसेंजर

कोल्हापूर - पुणे

०३:२५

२ मि.

4

११०३०

कोयना एक्स्प्रेस

कोल्हापूर - मुंबई

१४:०८

२ मि.

5

११०३९

महाराष्ट्र एक्स्प्रेस

कोल्हापूर - गोंदिया

२१:१५ 

२ मि.

 अ.क्र.      गाडी
  क्रमांक
  गाडीचे नाव       पासून - पर्यंत       वेळ  थांबा

6

११०४०

महाराष्ट्र एक्स्प्रेस

गोंदिया - कोल्हापूर

५:५०

२ मि.

7

५१४०९

पॅसेंजर

पुणे -  कोल्हापूर

१०:४०

२ मि.

8

११०२९

कोयना एक्स्प्रेस

मुंबई - कोल्हापूर

१३:५०

२ मि.

9

५१४३५

पॅसेंजर

पुणे - सातारा

१८:३५

२ मि.

10

११०२३

सह्याद्री एक्स्प्रेस

मुंबई - कोल्हापूर

२३:१०

२ मि.


महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून श्रीक्षेत्र जेजुरीचे रस्तामार्गे अंतर

 

पुणे

४७ किमी

              

नाशिक

२६३ किमी

आळंदी

६९ किमी

त्रिंबकेश्वर

२९२ किमी

पांचगणी

९६ किमी

साजन

२७० किमी

रायगड

१०३ किमी

जव्हार

२९० किमी

महाबळेश्वर

११४ किमी

दाजीपुर

३०३ किमी

कामशेत

  ९८ किमी

तुळजापूर

२५३ किमी

नारायणगाव

१२९ किमी

औरंगाबाद

२५० किमी

लोणावळा 

११६ किमी

पालघर

२९० किमी

खंडाळा

१२० किमी

घृष्णेश्वर

२७१ किमी

राजमाची

१३१ किमी

कुणकेश्वर

३८४ किमी

कोलाड   

१६९ किमी

आंबोली

३४३ किमी

भीमाशंकर

१५५ किमी

नागपूर

९४७ किमी

कर्जत

१५० किमी

माहूरगड

 ५५४ किमी

माळशेज घाट

१७५ किमी

सप्तश्रुंगी गड

३३५ किमी

माथेरान

१८३ किमी

मंगळवेढा

 १९० किमी

हरिहरेश्वर

२०९ किमी

शनि शिंगणापूर

१८५ किमी

हरणाई

२०८ किमी

गोंदवले

११० किमी

दुर्षेत

१७२ किमी

शिखर शिंगणापूर

१०३ किमी

श्रीवर्धन

२०१ किमी

 

किमी

मुरुड  जंजिरा

२१९ किमी

 

किमी

कर्नाळा 

१७७ किमी

 

किमी

गुहागर

२४० किमी

 

 किमी

काशीद

२२३ किमी

 

किमी

पंढरपूर

१६९ किमी

 

किमी

अलिबाग

१९२ किमी

 

किमी

माहुली  फोर्ट

२३८ किमी

 

किमी

मुंबई

२०३ किमी

 

किमी

शिर्डी

२२१ किमी

 

किमी

इगतपुरी

२९० किमी

 

किमी

रत्नागिरी

२९० किमी

 

किमी

कोल्हापूर

 किमी

 

किमी

वज्रेश्वरी

२३४ किमी

 

किमी

खोडला

२९१ किमी

 

 किमी

Bookmark and Share