खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
मणीसूर
व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या
विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया
शक्ती ने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते
धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याठिकाणी अवतरल्या
नंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली "या भूमीवर लिंग
रूपाने आपण सदैव राहावे." सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने
तथास्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. आज कडेपठार किंवा
जयाद्री पर्वत म्हणतात तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान
ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते. अशा या
महत्व पूर्ण स्थानाची आंपण माहिती करून घेऊ.
जेजुरी
गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे साडेतीन किलोमीटरवर जयाद्रीच्या पठारावर
कडेपठार देवतालिंग हे श्रीखंडोबाचे स्थान आहे यालाच काहीलोक जुनागड असेही म्हणतात. जेजुरीपासून दोन किलोमीटर
अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळ विहीर परिसर आहे, इथपर्यंत डांबरी सडक
असल्याने गाडीने जाता येते तेथून पुढे पायरी मार्गाने दीड किलोमीटर अंतर
चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. वाटेमध्ये हेगडी प्रधान मंदिर,
भगवानगिरी मठ, गणेश मंदिर व राम मंदिर
लागतात. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात होती परंतु कालौघात बरीच
पडझड झालेली दिसते. साध्य स्थितीमध्ये मंदिराच्या वायव्य दिशेकडून मंदिर
आवारामध्ये प्रवेश होतो,तेथून पुढे डावीकडे गेल्यानंतर पूर्वेकडे नंदिमंडप
त्याचे पाठीमागे पूर्वेकडील प्रवेश द्वार व त्यावरील नगारखाना दिसतो. नंदी
मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्यामागे एक कथा सांगितली जाते 'गणांनी मार्तंड
भैरवाची पूजा केली त्याचे प्रतिक म्हणून श्रीमार्तंड भैरवाच्या नंदिसोबत गणांचा नंदी सुद्धा सेवेसी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली.'नंदी मंडपापुढे मोठे कासव आहे अलीकडील काळात त्याच्यावर ग्रेनाईट फरशी
बसविण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सदर, मध्य गर्भगृह व मुख्य
गर्भगृह असे विभागलेले आहे. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना
दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्ती आहेत. मध्य गर्भ
गृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये खालील बाजूस
खंडोबा-म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग,
घोडा, कुत्रा, व महिषासुर मार्दीनीची मूर्ती आहेत. त्यापाठीमागे प्रभावळी
मध्ये श्रीखंडोबा म्हाळसा चा पितळी मूर्ती जोड आहे,त्याच्या पाठीमागे
भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी
मूर्ती आहे, त्यासोबतच दोन्ही बाजूना देवीमूर्ती आहेत. कोनाड्याच्या
बाहेरील एका बाजूस गणेशाची संगमरवरी मूर्ती व दुस-या बाजूस श्रीमार्तंड
भैरवाची छोटी दगडी मूर्ती आहे. मुख्य
गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस
छोट्या खोलीमध्ये देवाचे शेजघर आहे. मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडेकडे
पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे. तर दक्षिणेकडील बाजूस ओव-या व एक प्रवेशद्वार
आहे. पश्चिमेकडील ओवरीमध्ये देवाचे भंडार गृह आहे येथे घटस्थापनेवेळी
उत्सव मूर्ती या ठिकाणी बसवितात. भंडार गृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील
काळामध्ये स्थापनी झालेली घोड्यावर स्वार झालेल्या श्रीखंडोबाची मूर्ती
आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्रीपंचलिंग मंदिर आहे.आहेत.
आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे व त्यावर
बगाडाचा खांब आहे. संन्यासी आणि अध्यात्मिक गुरु यांचे दृष्टीने या
स्थानाला अनन्य साधारण महत्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी
समाधीस्थळे आढळतात.मंदिर कोणी व केव्हा बांधले याविषयी कुठेही उल्लेख आढळत नाही.श्रीराम मंदिराव्यतिरिक्त इतरत्र कुठेही शिलालेख सापडत नाहीत.


सदानंदाचा यळकोट