Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

गुढीपाडवा

जागतिक स्तरावर परंपरा,स्थळ कालानुरूप वर्षारंभ वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जातात, तसेच हिंदू संस्कृती मध्ये हि वेगवेगळे वर्षारंभ आहेत परंतु सर्वसाधारण सर्वमान्य असा चैत्र शुक्ल प्रतिपदेला वर्षारंभ साजरा करण्याची आपली परंपरा आहे.​​ ख्रिस्ताब्द १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, विक्रम संवत कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून,शालिवाहन शक चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून, पारसी फरवर्दिन पासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एका कुंभाराच्या पोटी जन्म घेतलेला महाराष्ट्रीय होता. शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळेशालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. यादिवशी संवत्सर प्रारंभ होत असते, संवत्सर म्हणजे साठ वर्षाचे कालचक्र यातील प्रत्येक वर्षाला स्वतःचे असे एक नाव असते जसे नंदन , विजय इ.  साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो.
"ऋतुनां अहं कुसुमाकर"वसंत ऋतू ही माझी विभूती आहे, असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो.

गुढी उभारण्याचा विधी 

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान मुखमार्जन उरकून दारावर पानाफुलांची तोरणे लावावीत. गुढी उभी करण्याच्या वेळूच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.वेळूच्या काठीच्या निमुळत्याटोकाला नवे कोरेरेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि गाठी ( साखरेची माळ ) बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी. ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गूळ कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी.तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधा-यांना वंदन करावे, त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असेल त्या वर्षाच्या कालावधीमध्ये असणा-या स्थितीवरून - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी आहे याचे वर्णन संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.
सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरावात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)

पौराणिक संदर्भ 
ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढीपाडव्याला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी,
प्रभू राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगरजनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली सोन्यामोत्यांनी व हिरेमाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो.
वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंद्राने  चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
आजकाल काही संघटना गुढीपाडवा या सणाचा संभाजीराजेंच्या मृत्यू संदर्भांमध्ये जोडतात परंतु दोन्हीचा काडीमात्र संबंध नाही आणि गुढी उभारणे हे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उभा केलेला धर्मध्वज आहे आणि हा उत्सव आनंदात साजरा व्हायला हवा.

वैज्ञानिक संकल्पना
कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सामर्थ्यही ह्यात आहे.मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग या परंपरेत आहे. वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे ही प्रथा सांगत आहे.

श्रीक्षेत्र जेजुरी ऑगस्ट १९९१ मध्ये अघटीत घटना घडली मंदिरातील देवाच्या मूर्तींची चोरी झाली परंतु एक महिन्याच्या अवधी मध्ये दिनांक १२ सप्टेंबर १९९१ रोजी मूर्ती सापडल्यानंतर उत्स्फुर्तपणे मूर्तींच्या स्वागतासाठी नागरिकांनी गुढ्याउभारल्या होत्या यादिवशी जेजुरीकर नागरिकांनी वर्षातील सारे सण साजरे होत असल्याचा अनुभव घेतला होता.


श्रीरामनवमी

श्रीरामनवमी अर्थात चैत्र शुद्ध नवमी, श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरी होत असते.  या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्रीरामचंद्रांचा जन्म झाला.देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
श्रीरामनवमी उत्सव
श्रीराम मंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळीश्रीरामाची मूर्ती किंवा कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.
चैत्र शुद्ध नवमी हा चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस रामाचा जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२.०० वाजता रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामजन्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.
भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रामनवमीचे एक व्रतही आहे. भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी, गुरूवार, पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता. विशेष म्हणजे, महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहण्यास सुरवात केली होती.
श्रीरामनवमी व्रत
चैत्र शुक्ल अष्टमीला सकाळी लवकर स्नान आटोपून श्रीरामाचे नामस्मरण करावे.
चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्म मुहर्तात ऊठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे.
‘उपोष्य नवमी त्व यामेष्वष्टसु राघव| तेन प्रीतो भव त्वं भो संसारात् त्राहि मां हरे||’ या मंत्राने ईश्वराप्रती व्रत भावना प्रकट करावी.
त्यानंतर, ‘मम भगवत्प्रीतिकामनया (वामुकफलप्राप्तिकामनया) रामजयंतीव्रतमहं करिष्ये’ हा संकल्प करून काम- क्रोध-लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे.
मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे.
घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
कलशावर रामपंचायतन (त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी.  त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा
करावी.
रामनवमीच्या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास ठेवला पाहिजे.
दिवसभर ईश्वराचे भजन-स्मरण, स्तोत्र-पाठ, हवन आणि उत्सव साजरा करावा.श्रीराम कथा वाचन करावी.
या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.
प्रभु श्रीरामचंद्र चरित्र-श्रवण करून जागरण करा.
दुसर्‍या दिवशी (दशमीला) पारायण करून व्रत सोडावे.
गरीबांना दान करून त्यांना जेवू घालावे.
रामनवमी व्रताचे फळ
हे व्रत नित्य, नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहे. नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्‍यभर केले तर आयुष्य आनंदमय होते.
एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच्छ फळ मिळते.
विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते.

वटसावित्रीव्रत


सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृध्दीसाठी करावयाचे एक व्रत . हे ज्येष्ठ पोर्णिमाला करतात. ज्येष्ठ शु. त्रयोदशीपासून पोर्णिमेस हे त्रिरात्रव्रत करावे; असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पोर्णिमाच्या दिवशी उपवास करावा.सावित्रीसह, ब्रम्हदेव ही या व्रताची मुख्य देवता असून, सत्यवान सावित्री ,नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.
या व्रताचा विधी असा:-
नदीकाठील वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी-

सावित्री ब्रम्हसावित्री सर्वदा प्रियभाषिणी ।
तेन सत्येन मां पाहि दुःखसंसारसागरात् ।
अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगस्तथाऽस्माक भूयाज्जन्भान जन्मानि ।।

पुजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा श्रवण करावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पुजा सांगितलेली असली तरी रुढी मात्र वेगळी आहे.सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला , या संकेतला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाची पूजा करतात.
त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्या प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात, नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्रीची-ब्रम्हदेव, सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पुजन करतात व प्रार्थना करतात.
वड जवळपास नसेल, वटसावित्रीचे चित्र भिँतीवर चिकटवुन त्याची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पूजेनंतर सुवासिनीँना सौभाग्यवायने देतात.
व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शु. द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किँवा घरी चंदनाने काढलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी सर्वत्रोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष , लाकडांचा भारा, कु-हाड व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रम्हा, सावित्री, सत्यवान त्याची पत्नी सावित्री , यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्याची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन , नृत्य. गीते इ. कार्यक्रम करतात .चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोविस, सोळा, बारा, किँवा आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राम्हणभोजन घालून व्रताची समाप्ती करतात.
भारतखंडात अनेक प्रतिव्रता प्रसिध्द आहेत. पण त्यात सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. एखाद्या सुवासिनीने दुसर्या स्त्रीला नमस्कार केला असता ती ''जन्मसावित्री हो'' असाच आशीर्वाद तिला देते. सावित्री हे भारतीय संस्कृतीत अखंड सौभाग्याचे प्रतिक ठरले आहे
बंगालमध्ये वटसावित्रीव्रत करण्याची रीत थोडी वेगळी आहे. बंगाली सुवासिनी या दिवशी आपल्या पतीची पूजा करतात. त्या प्रसंगी पतीच्या अंगाला सुगंधी तेल व चंदनाची उटी लावतात. त्याच्या गळ्यात फुलांचा हार घालतात आणि त्याला नवीन वस्त्र देतात. याव्यतिरिक्त , त्या यमाचीही पूजा करतात. आणि त्याला फुले, फळे व वडाची डहाळी अर्पण करतात.

दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस

मंगळवार दि. ०१ ऑगस्ट रोजी  आषाढ अमावस्या आहे. हिलाच दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात. अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे 'गटारी अमावस्या ' आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद यामहिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मग या सर्वाचे शौकीन आषाढ मधीलहा दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात.

घरामध्ये सुख, समृद्धी आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होण्यासाठी व घरातील इडापिडा टळावी म्हणून अंधःकार नाहीसा करून तेजोमय प्रकाश देणा-या दिव्यांची पूजा करावी असे शास्त्रात सांगितले आहे.  आषाढ महिन्यातील संतत धारेमुळे धरणी हिरवाईच्या शालूने नटते त्यासोबतच जलप्रदूषणाने साथीचे आजार हि घेऊन येते. अशा साथीच्या आजारापासून रक्षण करणारी म्हसोबा, मरीआई सारख्या क्षेत्रपाल दैवतांना संतुष्ट करण्यासाठी या महिन्यात सामिष आहार दिला जाण्याची परंपरा आहे. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात,

तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी अलक्ष्मी निघुन जाते अशी कल्पना आहे .या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे,समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या इत्यादी घासून-पुसून एकत्र मांडून त्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित केले जातात त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलांनी पूजा केली जाते. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवेपेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला त्यानंतर गोडाचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थनाकरतात. ती प्रार्थना अशी-

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌|

गृहाण मत्कृतांपूजां सर्वकामप्रदो भव॥

त्याचा अर्थ असा – ‘‘हे दीपा, तू सूर्यरुप वअग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणिमाझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.
 

दीपज्योति:परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:।

दीपोहरतिमे पापंसंध्यादीपं नामोस्तुते।।

शुभं करोतुकल्याणमारोग्यं सुखं सम्पदां।

शत्रुवृद्धिविनाशं च दीपज्योति: नमोस्तुति।।


दीप अमावास्येची कहाणी
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टीनावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविलेकी गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने आईच्या इच्छेविरोधात विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे केले. सगुणाने गरिबीतच संसार करू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजाची रत्नजडीत अंगठी एका घारीने उचलून नेली. घारीच्या पकडीतून सुटलेली अंगठी सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने संतुष्ट होऊन इच्छांवर मागण्यास सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या अमावस्येला राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्‍या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग अमावस्येला सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्‍या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्‍या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य सुख समृद्धी नांदू लागली.

· दीप प्रज्वलनाच्या पद्धती -
सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे.

दिव्याची वात

पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.

पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.

उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.

दक्षिण दिशेकडे असल्यास धन आणि जीवित हानी होऊ शकते.

नागपंचमी

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे.
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी उन पडे.

अशा आनंद दायी आणि मंगलमय वातावरणात श्रावण महिन्यातील पहिला सण येतो तो नागपंचमी. सर्प कुळातील राजा समजला नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा निर्माण झाली असल्याचे तज्ञ मंडळींचे अनुमान आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे.

सर्प म्हटले की आपल्याला भीती वाटते व आपण त्याला मारायला धावतो परंतु साक्षात भगवान शंकर महादेवांनी नाग चक्क गळ्यात आभूषण म्हणून बाळगले तर श्रीविष्णूनी शेषावरच शयन केले आहे. कृषीप्रधान संस्कृतीत उंदीर घुशीसारखे जीव पिकांची नासधूस सतत करीत असतात. त्यांचा नाश करून साप आपल्या शेतातील धनधान्य समृद्ध ठेवण्याची जबाबदारी अप्रत्यक्षरीत्या घेत असतो.
वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात.अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात. नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. नवनागांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) अनंत २) वासुकी ३) शेष ४) पद्मनाभ ५) तक्षक ६) कालीया ७) शंखापाल ८) कंषल ९) धृतराष्ट्र
स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.

'भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करणयामागे एक कारण आहे. या विषयीची कथा ...

नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास करून पंचमीला नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..

तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.

श्रीयाळ षष्ठी

श्रीधरस्वामी नाझरेकर यांच्या "शिवलीलामृत" या ग्रंथामध्ये राजा श्रीयाळश्रेष्ठ, राणी चांगुणा आणि चिलिया बाळाची कथा दिली आहे ती पुढीलप्रमाणे
श्रीयाळ
श्रेष्ठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता, त्याची चांगुणा नावाची राणी होती. अनेक वर्ष या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. अनेक नवससायासानंतर अनेक वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिले. त्यानंतर श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणीला मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी लाडाने "चिलिया" असे ठेवले. राजा राणी आणि राजकुमार अगदी आनंदात होते. त्यांच्या धनधान्याने भरलेल्या घरी येणा-या प्रत्येकाला पोटभर आणि हवे ते जेवायला वाढले जात असे. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणा-या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत.
एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळश्रेष्ठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली. पण श्रीयाळश्रेष्ठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण अतिथी आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं केले. एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून राणीने बाळाचं कांडण केलेलं शीर बाजूला काढून ठेवले आणि मांस शिजवले ते फक्त धडाचं. जेव्हा ते साधू पुढे आणले तेव्हा साधूच्या वेशातील भगवान शंकरांना लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे. पुन्हा एकदा क्रोधीत
होऊन साधू जेवण न करता उठतात पण मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणीने त्या साधूचे पाय धरून माफी मागितली. भगवान शंकराची करुणा भाकली "भगवंताआता आमची किती परीक्षा पाहणार आहेस". मग चांगुणा राणीने ते शीर शिजवले आणि साधूच्या ताटामध्ये वाढले.  
राजा-राणीने साधुपुढे हात जोडून पदर पसरून याचना केली "हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण कर". मग साधू वेशातील भगवान शंकर त्यांचा त्याग पाहून प्रसन्न झाले आणि म्हणाले तुमची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला काय हवा तो इच्छित वर मागा. बिचारी राणी चांगुणा पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते आणि साधूला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तुम्ही धुऊन टाकू शकता का? आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते.आणि समोर पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येत आहे आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात आणि त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. श्रीयाळश्रेष्ठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो आणि तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त दीड घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं. 
श्रीयाळ श्रेष्ठ अर्थात शिराळशेठ ची कथा  
इसवी सन १३९६ ते १४०८ पर्जन्यमान कमी झाल्याने दख्खन प्रदेशात बारा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते. विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अराजक माजले होते, अन्न पाण्यावाचून लोक मृत्यूमुखी पडत होते. रयत गाव सोडून परागंदा होत होती. यावेळी शिवभक्त श्रीयाळ श्रेष्ठ या सावकाराने रयतेच्या यातना पाहून आपली सारी संपत्ती आणि धान्य कोठार मुक्त केले. त्याची हि दानशूर वृत्ती पाहून आदिलशाहने त्याला एक दिवसासाठी राजा केले. परंतु हर्षोल्हासाने औट घटकेतच मृत्यू पावला पण या 
औट घटकेत रयतेच्या हिताची अनेक कामे केली, तो दिवस होता श्रावण शुद्ध षष्ठी म्हणून आजही हा दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. श्रीयाळ श्रेष्ठ चे कालौघात शिराळशेठ असा अपभ्रंश झाला, तर श्रीयाळ श्रेष्ठ शिव भक्त असल्याने शंकरोबा या ग्रामीण भाषेत ओळखला जातो त्याचेच सक्रोबा असे नामाभिधान प्राप्त झाले. 
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगड मंदिरामध्ये आणि कडेपठार मंदिरामध्ये सक्रोबा पूजन केले जाते. त्यासाठी 
श्रीयाळ श्रेष्ठची माती, बांबूच्या कामठ्या वापरून राजवाडा बनविला जातो, पुरातन काळामध्ये घरांना सजवण्यासाठी धान्याचा  वापर करण्यात येई. म्हणून या महालाला डाळ आणि गुंजेने सजवलेलं आहे. आतील मातीच्या भांड्यांमध्ये डाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, साखर इ. धान्ये भरून ठेवलेली असतात.त्याला गुंज, डाळी इ. साहित्यांनी सजविली जाते,आतमध्ये अन्न- धान्न्यांनी भरलेली मातीची भांडी, तसेच अन्न बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी ठेवलेली असतात. राजवाड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते तर हवेलीच्या वरील भागामध्ये श्रीयाळची मूर्ती बनविली जाते. मंदिरातील सदरेवर आरती करून कोळी समाजातील लांघी कुटुंबियातील व्यक्ती ती हवेली डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पायरी मार्गाने खाली उतरून 
नगर पेठेतून लेंडी ओढ्यानजीकच्या चिल्लाळाची विहीर येथे आरती करून विसर्जन केले जाते. यावेळी वीर दांगट, घडशी समाजातील तरुण ढोल सनई वाजवून देवाची सेवा करतात तर गुरव पूजारी पूजेची व्यवस्था करतात. 

 

aaaaaaaaaaaaaaaaaaaa

हरतालिका पूजन..

आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत. त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.

हरतालिकेला नदी वा समुद्रातून वाळू आणून मैत्रीण, पार्वती वं तीन शिवलिंगाची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करतात. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. फलाहार करतात. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करतात. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून देवीचे विसर्जन करतात.
हे व्रत भक्तीभावाने, निष्ठेने केल्यास मुलींना आपल्या मनाजोगा वर, अखंड सौभाग्य, आरोग्य, संतती वं संपत्तीचा लाभ होतो.
हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.
ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशिवालाच आपला पती मानले होते.
पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.
ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.
हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच खरा हरतालीकेचा संदेश आहे.

गणेशोत्सव

महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आगळावेगळा सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधुमीने साजरा केला जातो. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. गणपती ही ज्ञानाची देवता. गजानन हा विघ्नहर्ता मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा प्रघात आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेला कोणताही मराठी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो.
या सणाला शाडूच्या मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात.पर्यावरणाला हानिकारक असणा-या प्लास्टर ऑफ परीस च्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाहीत त्यामुळे गणरायाची विटंबना होते म्हणून शाडूच्या मातीचीच मूर्ती बघावी. त्यापैकी एक घरी आणावी. गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर ताम्हण, रूमाल घेऊन जातात. गणपती आणतांना झाकून आणतात व गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पहातात. गणपती आणतेवेळी गणपतीपुढें काही नाणी व गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पध्दत आहे. गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात. नंतर गणपती आणणा-या व्यक्तिच्या पायावर गरम पाणी घालतात. गणपतीला व गणपती आणणा-या व्यक्तिला कुंकू लावतात, पाच सवाष्णीं गणपतीला औक्षण करतात. पाटावर तांदूळ पसरून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात. गणपतीच्या पूजेकरिता नारळ, एकवीस मण्यांचे वस्त्र, फुले-पत्री, शमी, दुर्वा, जानवे, गूळ-खोब-याचा नैवेद्य, केवडयाचे कणीस इ. साहित्य लागते. गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते.गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करतात. यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात.

दररोज सकाळी व सायंकाळी पूजा-आरती करून, केळे-पेरू वगैरे खिरापत संध्याकाळी आरतीचे वेळी देतात. गणेशाची आरती म्हणजे बाल गोपालांसाठी आनंदाचे उधान असते, यानिमित्ताने देवतांच्या पाच,सात किंवा आकार आरत्या म्हंटल्या जातात. त्यानंतर प्रार्थना, मंत्रपुष्पांजली होऊन खिरापतीचा प्रसाद सर्वांना वाटला जातो.
या उत्सवामध्ये मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे, गणरायाला प्रिय असलेले तांदुळाच्या उकडीचे मोदक करतात.
सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो.
गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. झांज घेऊन 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.
नंतर नदीकाठची वाळू किंवा विहीरीजवळचे खडे आणून घरांत चारी बाजूला टाकतात. समज असा आहे की, चारी बाजूला वाळू किंवा खडे टाकले असतां जनावराची भिती नसते. गणपती जवळ टेवलेला नारळ नदीवर, विहीरीवर फोडातात. प्रसाद म्हणून खोबरे वाटतात. घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिरापत देतात.
काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्यावेळी गणपतीच्या जागी तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात. गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहेमीप्रमाणे आरती, मंत्रपुष्प म्हणून सांगता करण्याची पध्दत आहे.


 

ऋषिपंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीस ऋषिपंचमी म्हणतात. पंचमी ही मध्याह्न व्यापिनी घ्यावी. दोन दिवस मध्याह्न असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. या दिवशी ऋषींचे पूजन करून न नांगरलेल्या जमिनीत उत्पन्न झालेल्या शाकांचा आहार करावा. या दिवशीं काश्यपादि सप्तऋषि व अरूंधती याचें पूजन करतात. नद्यांच्या संगमावर अथवा समुद्रस्नान या दिवशीं करावें व  स्नानापूर्वी आघाड्या च्या काड्यांनीं दंतधावन करावें असा विधि आहे. उपवास करून बैलाच्या श्रमावांचून उत्पन्न केलेल्या खाद्यपदार्थांचा नैवेद्यास उपयोग करितात. हें व्रत ऋतुस्नात होणार्‍या    (रजोदोष शमनार्थ) स्त्रियांनीं करावयाचें असते. कोणी पुरूषहि हें व्रत करतात.

या व्रतासंबंधीं ब्रंह्मांडपुराणांत कथा आहे ती अशी:-

सिताश्व राजानें विचारल्यावरून ब्रह्मदेवानें सांगितलें कीं, विदर्भ देशांत उत्तंक नांवाचा एक ब्राह्मण रहात असून सुशीला नांवाची त्याची एक पतिव्रता स्त्री होती. त्याला सुंविभूषणनामक पुत्र असून वैधव्य प्राप्त झालेली अशी एक कन्या होती. आपल्या पुत्रास घरीं ठेवून विधवा कन्येसह तो अरण्यांत रहात असे. एके रात्रीं तीं विधवा कन्या एका दगडावर निजली असतां तिच्या अंगावर अनेक कृमी उत्पन्न झालेले उत्तंकाच्या शिष्यानें पाहिले, व उत्तंकाच्या स्त्रीस सांगितलें. तिनें मुलीच्या अंगावर उत्पन्न झालेले कृमी पाहून एकाएकीं असे कृमी उत्पन्न होण्याचें कारण आपल्या भर्त्यास विचारलें असतां 'हीं पूर्वजन्मीं ब्राह्मणस्त्री असून रजस्वला झाली असतां दूर न राहतां ती तशीच गृहांत वावरत असे या पातकामुळें या कन्येच्या शरीरावर नित्य रात्रीं असे कृमी उत्पन्न होऊन सकाळीं नाहींसे होतात असें सांगितलें. पत्‍नीनें विचारल्यावरून उत्तंक म्हणाला कीं स्त्रियानीं रज:संपर्क दोष नाहींसा होण्याकरितां अरूंधतीसहित कश्यपादि सत्पऋषींचें पूजनरूप ऋषिपंचमी नामक व्रत करावें म्हणजे रज:संपर्क दोष नाहींसा होतो.

भविष्योत्तरपुराणांतील कृष्णानें धर्मास सांगितलेलीं कथा :-

पूर्वी इंद्रानें वृत्राला मारिलें. वृत्रासुर ब्राह्मण असल्यामुळें ब्रह्महत्येचें पातक घडलेला इंद्र लज्जित होऊन ब्रह्मदेवास शरण गेला असतां ब्रह्मदेवानें त्या ब्रह्महत्येचे चार विभाग करून एक भाग अग्नीच्या प्रथम ज्वालेत, दुसरा भाग नदीला प्रथम आलेल्या पुरांत, तिसरा भाग पर्वतशिखर व वृक्षजातींमध्यें आणि चवथा भाग स्त्रियांच्या रजांत ठेविला. यासाठीं रजस्वला स्त्रीस स्पर्श करू नये. ती प्रथम दिवषीं चांडाली, दूसर्‍या दिवशीं ब्रह्मघातिनी, तिसर्‍या दिवशीं परटिणीप्रमाणें असून चौथ्या दिवशीं शुद्ध होते.
Placeholder Image

समजून अथवा न समजून झालेल्या रज:संपर्कानें होणार्‍या पापाचें क्षालन ऋषिपंचमी व्रतानें होतें असें सांगून यासंबंधीं श्रीकृष्णानें धर्मास आणखी एक कथा सांगितली आहे ती अशी:- विदर्भ देशांत सुमित्र नांवाचा एक विद्वान ब्राह्मण रहात होता. त्याची जयश्री नामक अत्यंत पतिव्रता पत्‍नी असून परिवार मोठा असल्यामुळें गृहकृत्यें करूनहि स्वत: आपल्या शेतांतील कामें ती करीत असे. एकदां ती रजस्वला असतां अस्पृश्य न राहतां घरांत तशीच वावरली. या पातकामुळें मृत्यूनंतर ती कृत्रीच्या जन्मास गेली. सुमित्र स्वत: पातकी नसतां पातकी स्त्रीच्या सहवासामुळें त्यास मृत्यू नंतर बैलाचा जन्म आला. पूर्व जन्मीच्या कांहीं सुकृत्यामुळें त्या दोघांना त्यांचा पूर्व जन्मीचा मुलगा जो सुमति त्याच्याच पदरीं राहण्याचा प्रसंग आला. एकदा सुमतिच्या बापाचा श्राद्धदिन आला असतां त्याच्या स्त्रीनें श्राद्धाकरितां स्वयंपाक तयार केला. त्या स्वयंपाकांतील पायसांत त्या स्त्रीच्या न कळत सर्पानें गरळ टाकलेलें थोड्या अंतरावरच असलेल्या कुत्रीनें पाहिलें आणि हा पायस भक्षण केल्यानें ब्राह्मणांना मृत्यु येईल हें जाणून त्या कुत्रीनें स्वयंपाकास स्पर्श केला. सुमतीच्या बायकोनें हें पाहून अतिशय रागानें त्या कुत्रीच्या डोक्यांत जळकें लांकूड मारलें आणि तो सर्व स्वयंपाक टाकून देऊन दुसरा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक विटाळल्यामुळें कुत्रीस त्या दिवशीं नित्याप्रमाणें खावयास कोणी न घातल्यामुळें तिला उपवास घडला. तिला व बैल झालेल्या तिच्या पतीला पूर्व जन्मीचें स्मरण असल्यामुळें ती दोघेंहि आपापल्या भाषेंत एकमेकांशीं बालत असत. शेतांतून बैल घरीं आल्यावर कुत्रीनें घडलेली हकीकत बैलास निवेदन केली. बैलानेंहि ''माझ्या मुलानें आज दिवसभर माझ्याकडून कष्टाचें काम करून घेऊन मला कांहींच खाऊ घातलें नाहीं आणि कामाची कसूर झाल्यास मारहि देण्यास कमी केलें नाहीं. आज मुलानें माझें श्राद्ध केले परंतु मी बुभुक्षितच असल्यामुळें तें श्राद्ध व्यर्थ होय.'' असें सांगितलें. कुत्री व बैल यांचें हें भाषण जवळच असलेल्या सुमति ब्राह्मणानें (त्याला जनावरांची भाषा कळत असल्यामुळें) ऐकल्यावरून मातापितरांच्या या अवस्थेबद्दल त्याला अत्यंत दु:ख झालें आणि या माता पितरांनां ही स्थिति कां प्रात्प झाली व ती कोणत्या उपायांनीं नाहींशी होईल हें त्यानें अत्यंत ज्ञानी अशा सर्वतपा नामक ऋषीला विचारलें असतां त्या ऋषीनें त्याच्या मातापितरांची पूर्व जन्माची हकीगत सांगून, हा रज:संपर्क दोष नाहींसा होण्यास ऋषिपंचमी नामक व्रत करावयास सांगितलें. नंतर सुमतीनें यथासांग व्रत केल्यावर त्याच्या मातापितरांची पशुयोनीपासून मुक्तता झाली.


 

ज्येष्ठा गौरी

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा. जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते. माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.
अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.

         पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात

हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात काही ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात, अशी एक रुढी आहे.)
हल्ली पीओपीचे आकर्षक मुखवटे आणि हातांचे साचे बाजारात उपलब्ध असल्याने बहुतांश ठिकाणी आकर्षक पद्धतीने साडी नेसवून गौरींची सजवत केलेली असते,तर काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात.सुंदर देखावे करून मंडप, देखावे व घर सजवितात. गौरी आवाहनाच्या दिवशी पाहुणे येतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर मेथीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.
गौरीपूजनाच्या दिवशी पंच पक्वान्न केली जातात, सोळा भाज्या केल्या जातात व सकाळी घरासमोर विशेष रांगोळी काढली जाते. प्रत्येकाच्या घरासमोर गौरीची पाऊले काढतात व दुपारी गौरीची पूजा करून आरती करतात, त्यानंतर नैवेद्य दाखवितात. तसेच काही बाहेरची माणसे जेवायला बोलावली जातात. गौरींसमोर फराळाचे पदार्थ आणि फळे यांची आकर्षक पद्धतीने मांडणी करून दिव्यांची आरास केलेली असते. यामध्ये गौरीची सजावट आकर्षक पद्धतीने करण्याची चढाओढ असते. आजकाल स्त्रियांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सजावट आणि देखाव्यांची स्पर्धा काही सामाजिक संस्था आयोजित करतात. सायंकाळी स्त्रिया हळदी कुंकवासाठी एकमेकींच्या घरी जातात. तिसर्‍या दिवशी गौरीचे विसर्जन करतात. भाद्रपदातील महालक्ष्मीच्या (गौरीच्या) वेळी अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. अशौचामुळे तेव्हा गौरीपूजन न करता आल्याने काही जण पुढे आश्विन मासात (महिन्यात) गौरीपूजन करतात, ते युक्त नाही. तसे करू नये. अशा प्रसंगी त्या वेळी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे) युक्त होय.

दोरकग्रहण

ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस ‘दोरकग्रहण’ असे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात.हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतात पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात. ज्येष्ठा गौरीपूजन हा वास्तविक कुळाचाराचा भाग आहे. त्यामुळे कोश (मिळकतीचे साधन) आणि चुली (स्वयंपाकघर) निराळे होताच प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात हे व्रत करणे अत्यावश्यक असते.


भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटले आहे. आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत चतुर्दशीनंतर एका दिवसाने पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्ष शुभकार्यास वर्ज्य मानला जातो. तो संपताच नवरात्राचा प्रारंभ होतो. भवानीदेवीचा जयजयकार सर्वत्र मुक्तकंठाने सुरू होतो आणि पुन्हा सणांचे दुसरे चक्र दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, दत्तजयंती, होळी असे सुरू होते. अनंत हे एका महानागाचे नाव असले आणि हे नाव जपणे पुण्यकारक मानले जात असले तरी अनंत हे विष्णुचे नाव आहे, अनंत चतुर्दशी व्रत हे काम्य व्रत असून याचा अवधी चौदा वर्षाचा सांगितला आहे. आपले गेलेले वैभव परत मिळावे या हेतूने अनंत चतुर्दशीचे व्रत सांगितले आहे. तसे हे व्रत सार्वत्रिक नाही. कोणी उपदेश केल्यानंतर किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते त्या कुळात चालू राहते. अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो.अनंत म्हणजे विष्णू ही या व्रताची मुख्य देवता असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा पूजाविधी खालीलप्रमाणेसकाळी नदीवर स्नान करुन सुशोभित अशी मांडवी तयार करतात. तिच्या खाली

Placeholder Image

सर्वतोभद्र मंडल काढून त्यावर तांब्याचे किंवा रुप्याचे पूर्णपात्र ठेवून त्या

 

त अष्टदळ काढतात. त्यावर सात फणांचा दर्भांकुरांनी बनविलेला शेष नाग ठेवून त्याच्यापुढे चौदा गाठीचा रेशमी दोरा ठेवला जातो. कुंभाला वस्त्रयुग्माचे वेष्टन करतात. कुंभातल्या जलाला यमुना म्हटले जाते. प्रथम यमुना व शेष यांचे पूजन झाल्यावर मग त्याच पूर्णपात्रात अग्न्युत्तारण करुन बसविलेल्या अनंतमूर्तीचे मंत्राचे ध्यान करतात. त्या मंत्राचा अर्थ असा- नूतन आम्रपल्लवाप्रमाणे ज्याची कांती आहे, ज्याच्या भुवया, मिशा व डोळे पिंगट आहेत. जो पितांबर नेसलेला व शंखचा- गदा धारण करणारा आहे व ज्याने सागराला भूषविले आहे अशा विश्‍वरुपाचे (विष्णूचे) मी ध्यान करतो. हा मंत्र म्हटल्यानंतर विष्णूची षोडशोपचारे पूजा केली जाते.

 

या पूजेमध्ये अंगपूजा, आवरणपूजा, अष्टोत्तरशतनामपूजा अशा आणखी अंगभूत पूजा असतात. पुष्पांजली झाल्यावर अर्ध्य दिले जाते. मग दोरकाची प्रार्थना करुन तो चौदा गाठीचा दोरा हातात किंवा गळ्यात बांधला जातो आणि शरीरावरील जुन्या दोर्‍याचे विसर्जन केले जाते. वड्या-घारग्यांचे वायन देऊन व्रतदेवतांचे विसर्जन करतात. या सांगतेसमयी दंपतीभोजन घातले जाते. चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन करतात. त्याचा विधी असा- त्रयोदशीस एकभुक्त, चतुर्दशीला तीळ, आवळे यांचा कल्क अंगाला लावून यथाविधी स्नान, अनंताची पूजा, रात्री एशत्थसमिधा, तील, व्रीही, यव, घृत या द्रव्यांनी व्रतदेवतांसाठी हवन, कथाश्रवण, पूर्णिमेला प्रातःकाळी पुन्हा पूजा नंतर आचार्यपूजन, प्रतिमादान, गोप्रदान, दक्षिणा, दान, आशिर्वादग्रहण, आंधळे, पांगळे यांना अन्नदान व नंतर विष्णू स्मरण करुन पारण्याचे भोजन केले जाते. याप्रमाणे अनंतचतुर्दशीचे काम्यव्रत सांगितले आहे. १० दिवस मृणमय (मातीच्या) गणपतीची स्थापना केल्यानंतर अनंतचतुर्दशीला या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते तो हा दिवस गणेश विसर्जनाचा म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे.

Placeholder Image


 

 

देवी नवरात्र

 

आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचं नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्रीपौर्णिमेपर्यंत असतं. आश्विनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते.

ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात.

नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्‍चिन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. नवरात्रोत्सावातला प्रत्येक दिवस हा वेगळी कथा, वेगळेच रूपक व वेगळेच महत्त्व घेऊन आलेला असतो. तो संदर्भ मातेच्या पराक्रमाशी निगडित असतो.

श्रीमहालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत. आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका, भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्‍वरी, श्‍यामा, ललिता, चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत.

'पुत्रान देही, धनं देही, देही सर्व कामांश्‍च देही में।
रूपं देही जयं देही यशो देही द्विषो देही।। '

हा दुर्गादेवीचा आधारभूत मंत्र मानला जातो.

घटस्थापना 

सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. वेदिकाय नम: या मंत्राने शेताची पूजा करतात.

त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा असतो.

पूर्वी सुवर्णाचा घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, घटावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात.

देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशी नागवेलीची सात, नऊ किंवा अकरा अशा विषम संख्येमधील पाने घेऊन त्यांची माळ टांगली जाते. अशाप्रकारे नवरात्रीचे पुढील दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात,परंतु ते शक्य नसेल तर उपलब्ध फुलांची माळ वाहावी. ही माळ जोडमाळ नवव्यादिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते. घटावर देवीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात. देवीजवळ अखंड दिवा लावतात. नंदादीप हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे.

नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड नंदादीपाकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते. देवीच्या पूजेसाठी गुरुजी बोलाविण्याची पद्धत आहे. त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्र्रोक्त, तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु गुरुजी न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावीनागवेलीची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा.

पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.

नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी घटस्थापना आणि घटोत्थापणा असे दोन दिवस तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते.

ललितापंचमी

पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी रचले आहे. नवरात्रोत्सवात 'ललिता पंचमी' हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. यालाच 'उपांग ललिता' व्रतही म्हणतातअश्‍विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात. अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे. या पूजाविधीमुळे विद्या, धन, संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते.

अष्टमी

अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. या वेळी देवीची भजनं, गोंधळगीतं, स्तवनं म्हणत महिला घागरी फुंकतात. उत्तररात्रीपर्यंत जागरण करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात.
खंडेनवमी

नवरात्रोत्सवातला नवमी महत्त्वाचा दिवस. नवमीला खंडेनवमी असे म्हणतात. या दिवशी आयुध आणि शस्त्रास्त्रपूजन केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये यंत्र, संगणकाचीही पूजा करतात. नवमीच्या दिवशी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.
घटोत्थापणा

आपआपल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. "मात: क्षमस्व' किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत काही ठिकाणी आहे.
विजयादशमी ( दसरा )

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला आपल्या देवघरातील देवांची षोडशोपचारे पूजा करतात त्यांना नूतन वस्त्र घातले जाते. घरामध्ये गोड नैवेद्य करून दाखविला जातो. देवासमोर बसून घरातील अथवा आप्तेष्ट पाच,सात अशा संख्येमध्ये पुरूष जमा होऊन तळीभंडार केला जातो. या विशेष दिवशी आपल्या घराजवळील देवालयाला भेट देऊन सोने लुटले जाते.


दीपावली

दिवाळी सण म्हणजे दीपोत्सवाचा सण असे भारतीय संकृतीत पुरातन काळा पासून म्हणले जात आहे. आपण धनत्रयोदशी या सणाला आपण धनाची पूजा करतो तर लक्ष्मीपूजन या सणाला लक्ष्मीची पूजा करतो.
वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी) (१० नोवेंबर २०१२)


वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे  द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात आणि दारामध्ये आकाशकंदील लावतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी ) (११ नोवेंबर २०१२)


भगवान धनवंतरीची पूजा करावी.घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करावी.सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.दिवा लावावा. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवावी. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाकावे . संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करावी. खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करावी.

'यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये
धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'

धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा.आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करावी.
'मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह।
त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।'

आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवावा.

नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी ) (१३ नोवेंबर २०१२)


‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.
या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

  • आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.
  •  यमतर्पण - अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात
  • ‘नरक चतुर्दशीच्या दिवशी गरजूंना भोजन देणे, म्हणजे धर्मस्वरूप अवतरीत होऊन कार्य करण्यासाठी आल्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणे. या माध्यमातून ब्रह्मांडात संचारत असलेल्या धर्मलहरींना पुष्टता प्रदान करून अवतारी कार्यासाठी, म्हणजेच पृथ्वीवर येणार्‍या त्रासदायक अधोगामी लहरींना नष्ट करण्यासाठी समष्टीच्या इच्छाशक्तीचा पुरवठा करून प्रत्यक्ष स्वरूपात कार्य करण्यासाठी आवाहन करणे. या माध्यमातून स्वतः धर्मकर्तव्य करून ईश्वराच्या कृपाशीर्वादात्मक लहरींना ग्रहण करता येते.
  • वस्त्रदान : वस्त्रदान करणे, म्हणजे देवतांच्या लहरींना भूतलावर येण्यासाठी दानाच्या स्वरूपात, म्हणजेच धर्माच्या संवर्धनतेच्या माध्यमातून पोषणता प्रदान करून कार्यस्वरूपाच्या जागृतीचे आवाहन करणे. या माध्यमातून आपल्या धनसंचयाला धर्म स्वरूपाच्या कार्यासाठी अर्पण केल्याने आपली आध्यात्मिक उन्नती होते.
  • यमदीपदान : यमदीपदान करणे, म्हणजे लयाच्या ऊर्जात्मक आणि चालनात्मक स्वरूपात होणार्‍या युद्धात स्वतःच्या रक्षणासाठी मृत्यूची देवता यम याला त्याचा भाग देऊन अपमृत्यूपासून स्वतःचे रक्षण करणे. या माध्यमातून धर्माला त्याचा हविर्भाग देऊन तृप्त करून आपले समष्टी कर्तव्य करता येते.

लक्ष्मी पूजन (आश्विन अमावस्या ) (१३ नोवेंबर २०१२)


या दिवशी सायंकाळी (प्रदोषकाळी) लक्ष्मी चे स्वागत करण्याची प्रथा आहे. अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मी पूजन, श्री लक्ष्मी चे स्वागत, अलक्ष्मी नि:स्सारण होते. या दिवशी बलीच्या बंदिवासातुन लक्ष्मी ची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्ति भावाने पूजा करतात. व्यापारी लोकही यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.

पूजेची वेळ सायंकाळी सहा नंतर (प्रदोषकाळ)

पूजेचे साहित्य:


विड्याच्या पानावर खारिक, बदाम, सुपारी, नाणे, निरांजन, अगरबत्ती, पाण्याचा तांब्या, पंचामृत, फुले( फुले शक्यतो पांढरी कान्हेर, शेवंती, जास्वंद, रुई, झेंडू) सीताफल,केळी ही फले व तुळशीपत्र जवळ ठेवावे. नैवेद्यास पूरणपोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, हळदी, कुंकू, अक्षता, फाराळाचे पदार्थ इत्यादि.

पूजेची मांडणी व् पूर्व तयारी :

लक्ष्मी-नारायणाचा फोटो

विड्याच्या पानावर श्रीलक्ष्मी ची सुपारी( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
विड्याच्या पानावर श्रीकुबेराची सुपारी ( कोजागिरी पोर्णीमेत वापरलेली).
कुलदेवतांचे टाक, श्रीलक्ष्मी (नाणे किंवा प्रतिमा), सोने, चांदी, नाणे, नोटा.
नारळ + खोबरे वाटी, त्यात खडी साखर, साळीच्या लाह्या, बत्ताशे.
मांडणी झाल्यावर तेथे रांगोळी काढावी. + घरासमोर तुळशी जवळ रांगोळी काढावी.
तुळशीपासून देवापर्यंत लक्ष्मीची व गाईची पावले काढावीत.
प्रवेशद्वारा बाहेर दोन्ही बाजुस स्वस्तिक काढावे

घरात तेलाचा दिवा लावून घ्यावा.स्वस्तिक काढून त्यावर नविन केरसुनी ठेवावी.
वरील मांडणी झाल्यावर तुलसी पूजन करावे.
तुलसी पूजन

तुळशीजवळ जाउन दिवा, अगरबत्ती लावून तिची हळद-कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी व् तुलसी स्तोत्र एक वेळा म्हणावे किंवा तुलसी मंत्र ११ वेळा म्हणावा.
तुलसी मंत्र :
 || ॐ -हीं क्लीं ऐं वृंदावन्ये स्वाहा ||

तुलसी स्तोत्र
तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी|
अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय समा ||
सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा|
द्वापारे चावतीर्णासी वृंदात्वं तुलसी क्ली: ||

कुंकू वाहून (पंचोपचार) पूजा करावी.

प्रथम श्री लक्ष्मी पूजन ध्यान मंत्र म्हणावा.
श्रीलक्ष्मी ध्यान मंत्र

ध्यायामी ता महालक्ष्मी कर्पूक्षोदपाण्डुराम|
शुभ्र वस्त्र परिधानां मुक्तभरण भूषिताम||
पंकजासन संस्थान स्मेराननसरोरुहाग|
शारदेन्दू कला कांती स्निग्धनेत्रा चतुर्भुजाम ||
पद्मयुग्मा अक्षयवर व्यग्रचारू कराम्बूजाम|
अभितो गजयुग्मेन सिच्यामानां करानुना ||


सर्व पुजेवर प्रथम फुलाने ४ वेळा पाणी शिंपडावे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा व् सर्व पुजेवर फुलाने थोड़े थोड़े पाणी शिंपडून १६ वेळा श्री सूक्त म्हणून नंतर लक्ष्मी-नारायणाच्या फोटो समोर एक वेळा पुरुष सूक्त वाचावे, सर्वांना अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता, फुले वहावी, धुप-दीप दाखवावा व् पुढील प्रार्थना म्हणावी.

श्रीलक्ष्मी प्रार्थना

कमलाचपला लक्ष्मी: चलाभुती: हरिप्रिया |
पद्मा पद्मात्मया समदूचै: श्रीपदमधारिणी ||
नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरिप्रिये|
या गति: त्वतप्रपन्नाना सागे भूयात त्वदर्चनात||
यादेवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता|
नमस्तसयै नमस्तसयै नमस्तसयै नमोनम:||
धनदायै नमस्तुभ्य निधीपदधिपायच|
भुवन्तुत्वत्प्रसादान्मे धनधन्यादी संपदा ||


फोटो व् सुपारीच्या स्वरूपातील देवतांची - खालील प्रमाणे पूजा सामूहिकपणे घरातील सदस्यांनी करावी. देव्हा-यातील गणपतीवर गणपती अथर्वशीर्ष अभिषेकयुक्त करून पुढे लक्ष्मीची, विष्णुंची, कुबेराची, कुलदेविची, कुलस्वामी श्रीखंडोबाची पूजा करावी. यानंतर बरोबर प्रदोष काळात लक्ष्मीच्या फोटोवर(चार हत्तीयुक्त), कुलदेविचा टाक, लक्ष्मी-नारायणाचा फोटो यावर १६ वेला श्रीसूक्त म्हणून अभिषेक, फुलाने पाणी शिंपडून करावा.( पाद्य, अर्घ्य, आचमन, जलस्नान, पंचामृत, पुन्हा जलस्नान फुलाने पाणी शिंपडून हळद-कुंकू, फुल वहावे. धुप-दीप नैवेद्य दाखवावा) नंतर गणपती, देवीची, नारायणाची आरती करावी. शेवटी क्षमा प्रार्थना म्हणून पूजेची सांगता करावी.

अलक्ष्मी नि:स्सारणम
या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, व् सर्व दिवे रात्रि १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावेत. घराच्या मागील भिंती पासून केरसूणीने एक सरळ रेषेत झाड़ू न उचलता प्रवेशद्वारा पर्यंत झाड़त आणावे. उंबरठ्यावर केरसुणी ठेवावी. केरसुणी चा एक फड तोडून बाहेर फेकावा म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो.

बलिप्रतिपदा (कार्तिक शु.१)(दि. १४ नोव्हेंबर २०१२)
बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो.

बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथि जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये; पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने वामन अवतार घेतलाव तो `ॐ भवति भिक्षां देही ।' म्हणजे `भिक्षा द्या' असे म्हणत बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ``काय हवे ?'' तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलिराजाने त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले. तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ``तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)'', असे बलिराजास सांगितले. तेव्हा `आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे', असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते; मात्र शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून. अभक्ष्यभक्षण, अपेयपान व अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात) पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशी ही दिवाळी. बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बलि व त्याची पत्‍नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. बलिप्रतिपदेस दिवाळीचा पाडवा म्हणतात.

गोवर्धन अन्नकूट :


धान्याच्या राशीवर गोपाळकृष्ण ठेवून त्याची पूजा करावी . गाय म्हणजे लक्ष्मी व् खोंड म्हणजे कुबेर समजुन त्यांची पूजा करावी. नव्या वहीची पूजा करून जमा-खर्च लिहण्यास सुरुवात करावी.

यम द्वितीया (भाऊबीज)(कार्तिक शु.द्वितीया )(दि.१५ नोव्हेंबर २०१२)



या दिवशी भावाने बहिणीच्या हातचे खावे. बहिणीने भावाला ओवाळावे. आज असंख्य बहिनीना संरक्षण देणा-या भावांची नितांत गरज आहे, याची भावांनी जाणीव ठेवली पाहिजे.

भोगी

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी, म्हणजे सुर्य धनु राशीमध्ये असतानाचा अखेरच्या दिवशी भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी खास पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ, तांदूळ, वाटणा, घेवडा आदी भाज्या घालून केलेली खिचडी, बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी त्यासोबत शेंगदाणे, वाटणा, पावटे,गाजर, हरभरे, वांगी या सर्वांची मिळून भाजी केली जाते त्याला "खेंगट" असे म्हणतात. देवाची व सूर्याची पूजा करुन खास खेंगट पदार्थांचा नैवेद्य दाखवितात.

मकर संक्रांत

सुर्य प्रतिमाह एका राशीमध्ये असतो,एका राशीतून दुस-या राशीमध्ये मार्गक्रमण करीत असतो त्याला संक्रमण म्हणजेच संक्रांत असे म्हणतात. सौर दिनदर्शिकेनुसार येणारा हिंदू संस्कृतीमधील लोकप्रिय सण म्हणजेच मकर संक्रांत. पौष महिन्यात सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो व हिंदू संस्कृतीप्रमाणे उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणा-या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होते. या नंतर दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो.संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुण्ययदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.
मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता सुखी झाली.
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरगडावर आणि श्रीकडेपठार देवता लिंग मंदिरामध्ये पंचक्रोशीतील स्त्रियांची ओवसा करण्यासाठी गर्दी होत असते. हा सण स्त्रियांचा खास आवडीचा या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ व तांदूळ अर्पण करतात. संक्रांतीनिमित्त
घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो येणा-या प्रत्येक सवाष्णीला सौभाग्य वाण लुटतात. हा सण परस्परांमध्ये स्नेह व प्रेम असावे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्वाचा आहे. तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असताना मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो. या दिवशी तीळगुळ देतांना ''तीळगुळ घ्या, गोड गोड बोला'' असे म्हणण्याची पध्दत आहे. या सणाला काळे वस्त्र परिधान करण्याची रूढी आहे. नवविवाहित दांपत्याला तिळगुळाच्या काटेरी हलव्याचे दागिने घातले जातात.
या दिवशी लहान थोर सर्व मंडळी विविध रंगांचे पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. गुजरातमध्ये खास पतंग महोत्सव भरविला जातो, यामध्ये  देश विदेशातील उत्साही स्पर्धक सहभागी होतात. संध्याकाळच्या वेळी आकाश विविध रंगांच्या पतंगांनी सुशोभित झालेले असते. हा सण परस्परांमध्ये प्रेम व सद्भाव वृध्दिंगत करीत असतो.

किंक्रांत

संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात. ज्योतिष शास्त्रानुसार पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हिंदू संस्कृती प्रमाणे वर्षातील अशुभ दिनांमध्ये गणला जाणारा किंक्रांत अर्थात कर, यादिवशी कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करीत नाहीत तर व्यापारी या दिवशी सौदा करण्याचे टाळतात. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. 

दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.

बोरन्हाण

शिशु संस्कारांपैकी "बोरन्हाण" हा एक संस्कार आहे तो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान बालकांचे 'बोरन्हाण' केले जाते. यावेळी मुलांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे करवे वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणा-या पिकपाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा, असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो.
बोरन्हणाच्या निमित्ताने बोरं, ऊस, हलवा हे पदार्थ मुलं खातात. नवीन चवींबरोबरच नव्या लोकांशीही त्यांची ओळख होते. ब-याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरन्हाण केलं जाते. या निमित्ताने लहानमोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते. आज कामाच्या निमित्ताने बाहेर राहणा-या आपल्या सगळ्यांसाठी ही काळाची गरज बनली आहे.

महाशिवरात्रीचे व्रत

Placeholder Imageपृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्व आहे, हे स्पष्ट होते. पूर्णिमान्त मास मानणाऱ्या लोकांच्या दृष्टीने महाशिवरात्र फाल्गुन महिन्यात येते. शिवरात्रीच्या कालनिश्चयाच्या बाबतीत इतरही बरेच मतभेद आहेत.
नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून त्यांपैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. दररोजची रात्र ही नित्यशिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्षशिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मासशिवरात्र आणि योग्याने आपल्या सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योगशिवरात्र मानली जाते

 

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचेव्रतकरावे.
महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ? याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते. माघ वद्य त्रयोदशीला एक वेळ भोजन करून रहावे, चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करावा आणि नंतर स्नान, शिवपूजा इ. द्वारे व्रत पूर्ण करावे, असे सांगितले जाते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत.

Placeholder Image

शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरीचार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येकयामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. गरजूंना वज्येष्ठांना पारण्याला भोजन घालावे. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊनव्रतसमाप्ती करावी.
या काळात उपवास, जागरण वगैरे गोष्टी नकळत घडल्या तरी व्यक्तीचा उद्धार होतो, अशी लोकांची श्रद्धा असून ती सूचित करणा-या अनेक कथाही प्रचलित आहेत. उदा., शिवरात्रीला नकळत उपवास घडल्यामुळे एका मृगाचा व व्याधाचा उद्धार झाला आणि त्यांना आकाशातील मृग व व्याध या नक्षत्रांचे रूप प्राप्त झाले. महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम्, गोकर्ण, वैजनाथ, शिखर-शिंगणापूर इ. असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात.
शिवपूजेची वैशिष्ट्ये :
१. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.
महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणा-या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय' हा नामजप जास्तीत जास्त करावा.
मध्यरात्र, वद्यपक्ष, शिशिर ऋतू, चतुर्दशी या महाशिवरात्रीच्या कालिक वैशिष्ट्यांमधून सृष्टीतील संहार व पुनर्निर्मिती यांचे चक्र सूचित होते, असे काही अभ्यासकांना वाटते.

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी अर्थात शिमगा


होळी

चैत्र वर्षारंभातील फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य सण शिमगा अर्थात हुताशनी पौर्णिमा होय, त्यामुळेच या महिन्याला शिमग्याचा महिना म्हंटले जाते. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो. होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा’ तर दक्षिणेत ‘कामदहन’ म्हणतात. बंगालमध्ये ‘दौलायात्रा’ म्हणून होळीचा सण होतो. ‘हुताशनी’ असेही होळीला नाव आहे. देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी करतात. आपल्याकडे गावांत प्रमुख नाक्यावर होळीची कुंडे तयार करून रोज रात्री पौर्णिमे पर्यत होळी पेटविणयात येते. पौर्णिमेपर्यत होळी पेटविणयात येते. पौर्णमेला प्रदोष काळी मोठी होळी होते व ती मध्ये पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य अर्पण करण्यात येतो.

पौराणिक कथा

हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पेटवून आनंद व्यक्य करतात.
आणखी एका पौराणिक कथेनुसार ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिल्या. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात बीभत्स बोलणारी, शिव्या द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे.
पुराणांत या संबंधी आणखी एक कथा सांगितली जाते. योगेशवर शंकर आपल्या तपाचरणांत गढून गेले असताना त्यांचे लक्ष पार्वतीकडे वेधावे व त्याच्या मनांत कामविकार निर्माण करावा म्हणून देवांनी कामदेव मदन याची योजना केली होती परंतु आपल्या तपाचरणांत विघ्न निर्माण करणाऱ्या या मदनाला शंकरानी आपला तिसरा डोळा उघडून भस्म करून टाकला, या स्मरणार्थ पौर्णिमेला होळी पेटविली जाते. तिसरा डोळा म्हणजे ज्ञानचक्षू माणसाचा हा ज्ञानचक्षू उघडला की तो विकारवश होत नाही विकारांवर मात करून तो आपले जीवन यशस्वी करतो
उत्तर भारतात फाल्गुन शुक्ल पंचमीपासून अनेक मंडळी लाल व पिवळी वस्त्रे धारण करून गुलाल उधळीत गाणी गात पौर्णिमेपर्यतचे दिवस मोठ्या आनंदाने घालवितात. होलिकादहन विधी मात्र पौर्णिमेस मध्यरात्री करण्याबद्दल सर्वत्र एकवाक्यता आहे. उत्तरे कडील लोक हा उत्सव कृष्णासंबधी आहे असें मानतात. कृष्णाला लहानपणी विषमय दुध पाजून ठार करण्यासाठी आलेल्या व स्वतः कृष्णाकडून शोषण होऊन मारल्या गेलेल्या पूतना मावशीचा हा दहन विधी मानतात.

होळी उत्सव साजरे करण्याची पद्धती

देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस लावून बाजूने शेणाच्या गोव-या रचाव्यात. व्रतकर्त्याने स्नान संध्या उरकून संकल्प करावा. नंतर होलिकायै नमः म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करून पाणी धरून प्रदक्षिणा मारावी. होळीमध्ये पुरण पोळीचा नैवेद्य द्यावा, आणि शंख ध्वनी करवा. होळी पूर्ण शांत झाल्यानंतर दूध व तुपाने होळी शांत करावी.
पूर्वी पौर्णिमेनंतर वद्य प्रतिपदेला वसंतोत्सवाचा आरंभ करीत त्यावेळी राजा दरबार भरवी व प्रजाजन त्याच्यावर गुलाल, शेंदूर, चंदन, अबीर वगैरे उधळून राजा विषयी आपले प्रेम व्यक्त करीत हा उत्सव फाल्गुन वद्य पंचमी किंवा रंगपंचमी पर्यत चाले. लोक परस्परांवर गुलाल किंवा रंगीत पाणी फेंकून मोकळेपणाने वागण्याचा आनंद लुटत पुढे अश्या स्वैर वातावरणात अर्वाच्य शब्द किंवा बीभत्स शब्द उच्चारण्याचा अजाण मुलामध्ये अनिष्ठ प्रकार सुरू झाला. सोंगे आणणे, खोडंया काढणे, चो-या करणे, लोकांना निष्कारण सतावणे असे अनिष्ठ प्रकार त्यांत शिरले आहेत. प्रौढ आणि सुबुध्द लोकांनी मुलांना व अज्ञजनांना योग्य जाणीव करून देऊन व योग्य वळण लावून त्यावर नियंत्रण घालणे जरूरीचे आहे. मनाचे दडपण कमी करून मानसिक ताण सैल करून कोडलेल्या भावनांना थोडाफार वाव देऊन काहीशा खेळीमेळीने व उच्चनीच भाव विसरून परस्परांशी मोकळे पणाने वागण्याचा हा सामाजिक सण आहे.
विषुववृत्तावर सूर्य येतो तो २१ मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे.

 

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील होळी
संपूर्ण भारतभर होळी साजरी केली जाते तशीच ती श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये साजरी केली जाते. मंदिरामध्ये पेटविल्या जाणा-या होळीसाठी जेजुरीकर ग्रामस्थांकडून सरपण, गोवरी किंवा पैसे स्वरूपामध्ये वर्गणी गोळा केली जाते. यासाठीहोळीच्या दिवशीठरलेले मानकरी, चोपदार मंदिरामध्ये धूपारती झाल्यानंतर गावामध्ये वर्गणी गोळा करण्यासाठी फिरतात. मोरे ढोल वाजवत आणि चोपदार हाळी देत वर्गणीची मागणी करतात तर डीखळे आणि भालेराव ग्रामस्थांकडून वस्तू आणि वर्गणी गोळाकरतात. सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ श्रद्धेने आपल्या इच्छाशक्ती प्रमाणे देवाच्या होळीसाठी हातभार लावतात. गेले कित्येक पिढ्या हि परंपरा चालू आहे त्यामध्ये कोणताही खंड न पडू देता आजही मानकरी भर उन्हामध्ये गावभर फिरून होळीसाठी वस्तू आणि वर्गणी गोळा करतात. तिन्ही सांजेला गोळा झालेल्या वस्तू आणि रोख रकमेतून साहित्य खरेदी केले जाते आणि गडावर पाहोचाविले जाते. जेजुरगडाच्या कोटा बाहेरील बाजूस होळी रचली जाते. रात्री मंदिरातील पूजा झाल्यानंतर होळी प्रज्वलित केली जाते. मंदिरातील होळी पेटल्याशिवाय गावातील कुठलीही सार्वजनिक अथवा घरगुती होळी पेटत नाही.

 

धूलिवंदन अर्थात धूळवड

धूलिवंदन अर्थात धूळवड
फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पहिल्या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुस-या दिवशी हा सण येत असल्याने रात्री पेटविलेल्या होळीची राख झालेली असते दुध,तुप आणि पाण्याने होळी शांत करून जमा झालेली राख आणि धूळ एकत्रित करून कपाळी लावली जाते व एकमेकांच्या अंगावर हि उडविली जाते यालाच धूळवड खेळणे म्हणतात. आज धूळवड हा शब्द राजकीय पुढा-यांच्या एकमेकांच्या शाब्दिक चिखलफेकीसाठी जास्त वापरला जातो.
या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरुन होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कै-याही मिळू लागतात. कै-या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात.
उत्तर भारतामध्ये मात्र या दिवशी रंग एकमेकांवर उडविला जातो, महाराष्ट्रात मात्र रंगपंचमी हा सण वेगळा साजरा केला जातो. आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार परप्रांतीयांच्या प्रभावात होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरु केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. धुळवडीला फक्त आणि फक्त राख मातीचा चिखल खेळण्याची आपली परंपरा आहे आणि रंगपंचमी हा वेगळा सण आहे हे तरुण पिढीला समजावून सांगण्याची वेळ आली आहे.

रंगपंचमी

Placeholder Imageफाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला ‘रंगपंचमी’ हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

या उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. ‘हा उत्सव सध्या प्राकृत लोक वद्य पंचमीपर्यंत साजरा करतात’, अशी माहितीही या ग्रंथाने दिली आहे. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते. पुराणकथेनुसार शंकराने फाल्गुन पौर्णिमेला मदनाला जाळले होते. त्यानंतर त्याने अनंगरूपाने त्याला पुन्हा जिवंत केल्याचा आनंद व्यक्त करणे, हा देखील या उत्सवामागचा हेतू असण्याची शक्यता आहे. पौर्णिमान्त मास मानण्याच्या पद्धतीमध्ये होळी पौर्णिमा ही वर्षाची अखेरची तिथी ठरल्यामुळे होळीनंतर नव्या वर्षाला प्रारंभ होतो व त्यानुसार रंगपंचमी हा नववर्षाच्या स्वागताचा उत्सवही असण्याची शक्यता आहे. जीर्ण झालेली सृष्टी होळीमध्ये जळून नष्ट झाली असून आता नव्या सृष्टीचा उदय झाला आहे, असेही या आनंदोत्सवातून सूचित केले जात असावे.

Placeholder Image

ग्नानंतरच्या पहिल्या वर्षी सासुरवाडीकडून जावयाचे जे बारा सण साजरे होतात, त्यांमध्ये रंगपंचमीचा अंतर्भाव आहे. त्या दिवशी नववधूला केशरी रंग उडविलेली नवी साडी सासरकडून मिळते. मराठ्यांच्या कारकीर्दीत सरदार वगैरे प्रतिष्ठित लोक रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करीत असत, असे शाहीर वगैरेंच्या वर्णनावरून दिसते. रंगपंचमीनिमित्त भरलेल्या दरबारात छोट्या जिजाईने पाच वर्षे वयाच्या शहाजी भोसले यांच्या अंगावर गुलाल उधळल्यामुळे त्यांचे पति-पत्नीचे नाते सूचित होऊन पुढे त्यांचा विवाह झाला, अशी वर्णने शाहिरांनी केली आहेत. काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी ‘बगाड’ घेण्याची पद्धत आहे.
जेजुरगडावर पारंपारिक रंगपंचमी
वसंत ऋतू मध्ये निसर्ग विविधरंगी फुलांच्या माध्यमातून रंगाची उधळण करीत असतो तर दुसरीकडे होळी नंतर उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते अशा वातावरणात एकरूप होण्यासाठी रंगपंचमीचा सण साजरा करण्याची आपली परंपरा आहे. परंपरा जपताना परिस्थितीचे भान ठेवण्याची आवश्यकता असते, हे भान ठेवून जेजुरीकरांनी विना पाणी, कोरडी रंगपंचमी साजरी करून भाविकांनाही पाण्याची बचत करण्याचा आदर्श घालून दिला.


 

Bookmark and Share