खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
सण - यात्रा - उत्सव
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये सर्वसाधारणपणे वर्षामध्ये सात ते आठ यात्रा भरतात,या व्यतिरिक्त काही खास उत्सव हि साजरे केले जातात.जुन्या ग्रंथांमधून जेजुरीमध्ये वेगवेगळे उत्सव साजरे होत असल्याचा उल्लेख सापडतो परंतु त्यातील वैशाखातील हिंदोळा व फाल्गुनातील टिपरी सारखे उत्सव कालौघात बंद पडले तर काही अजूनही मोठ्या प्रमाणात साजरे होतात.
चैत्र पौर्णिमा
गणपूजा
विजयादशमी
चंपाषष्ठी
पौष पौर्णिमा
माघ पौर्णिमा
महाशिवरात्री
सोमवती अमावस्या
गुरुपौर्णिमा
कला व संस्कृती
श्रीक्षेत्र जेजुरी जशी खंडेरायाची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती सांस्कृतिक राजधानी म्हणूनहीप्रसिद्ध आहे. जेजुरीला ही ओळख मिळाली ती येथील प्रतिभा शाली अशा लखलखत्या हि-यांमुळे महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील आणि देशाबाहेरील रसिकांचे रंजन होते. अनेक लहान मोठे कलाकार या नगरीमध्ये जन्माला आले, वाढले आणि आपल्या कलेच्या माध्यमातून जेजुरनगरीचे जगभर गाजविले. शाहिरी, गायन, तबला आणि ढोलकी वादन, हार्मोनियम, चित्रपट, नाटय आणि तमाशा अशा सर्वच कलाप्रकारामध्ये जेजुरीचे तारे चमकले आणि अजूनही त्यांची घोडदौड तशीच चालू आहे.
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
खंडेराव देखिला देव । जन यात्रा मिळाले सर्व ।
काय सांगू नाना वैभव ।।
लोकांची दाटी, स्वारांची दाटी । यात्रेची दाटी, दिवट्यांची दाटी ।
दिंड्यांची दाटी, वाद्यांची दाटी ।।
ढोल दमामे टाळ माधळ । बुरुग वाके नाना कल्लोळ ।
कर्णे काहाळ मिळवती मेळ ।।
हत्ती किंकाटती उंट भडकती । घोडे हिंसती, बैल डुरती ।
नामघोषे गर्जताती ।।
कोण कोठे काही कळेना । यात्रेमध्ये ते आकळेना ।
गर्द जाला आश्चर्य मना ।।
पुढे दाटी माघुन दाटी । दोहोंकडे दुकानदाटी ।
अंतराळी छत्र्यांची दाटी ।।
नंदकोले नाना निशाणे । तळपताती माहिनिशाणे ।
छत्रचामरे ती सुर्यापाने ।।...
नाना ब्रीदांचे ते डफगाणे । नाना भेदांचे दांड भेजणे ।
दाटी होता होती भांडणे ।।
बाजारी जावे चकित व्हावे । काय घ्यावे, काय न घ्यावे ।
सीमा नाही, धन्य वैभव ।।
येकेकडे निवांत माळी । तेथे जावे ते बाळी भोळी ।
देवा जाणे निवांत काळी ।।
रात्रभागी निवांत वेळा । ठाई ठाई गायनकळा ।
वाटे नेणो गाती कोकिळा ।।
दास म्हणे विवेकबळे । सकळांमध्ये परी निराळे ।
तेची सुख सर्वा आगळे ।।
----------------------------------------------
दगडूबाबा साळी
------------------------------------------------
अनामिक
तेथे विटेवरी उभा । येथे घोड्यावरी शोभा ।।
तेथे पुंडलिक निधान । येथे हेगडी प्रधान ।।
तेथे बुक्कियाचे लेणे । येथे भंडार भूषणे ।।
तेथे वाहे चंद्रभागा । येथे जटी वाहे गंगा ।।
तेथे मृदुंग विना टाळ । येथे वाघ्या मुरुळ्यांचा घोळ ।।
-------------------------------------
निरंजन रघुनाथ.
शिव जाला मार्तंड । मोडावया दैत्य बंड ।
करि दुष्टालागी दंड । भक्ता अखंड रक्षिता ।।
मागू प्रेमाची हे वारी । नरदेह - रविवारी ।
आलिया संसारी । चुकवू फेरे सर्वस्वे ।।
स्मरोनिया त्याचे गुण । येळकोट गाऊ गाण ।।
भुंकू होऊनिया श्वान । त्याचे द्वारी सर्वदा ।।
निरंजन आला वाघा । जावूनी माल्लारीला सांगा ।
चरणी थोडी जागा । ध्यावी भागा येईल ती ।।
२
मणिमल्लाचे मर्दन करिता घाम बहुत आला ।
त्यायोगे भस्माचा रंग पीतवर्ण जाला ।
म्हाळसा हे नाम येणे पार्वतीस दिले ।
बाणाई या नामे गंगेलागी बाहिले ।।
वेगवान नंदीचे वाहन अश्वरूप जाले ।
सामवेदि द्विज शापास्तव श्वानत्वा पावले ।।
बाणाईच्या पदस्पर्शाने निजपदा गेले ।
भरित-रोडगे वाहुनि पूजन निरंजने केले ।।
----------------------------------------
समर्थ रामदास
१
देव शिवाचा अवतार । जाऊनि बसला गडावर ।।
एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।।
एक विभूतीचे लेणे । एक भंडार भूषणे ।।
रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ।।
२
देशोदेशीचा जन उदंड येतो |
नाना प्रकारे नवस फेडितो |
देव त्याचे लळे पाळितो ।।
३
महीपति कळेना गति पाहो जाता सामर्थ्य किती |
करामती दावी अजामती ।।
तुरुक मातले फोडाया गेले । भोंगे उठिले तेही पिटिले ।
कोणे नेणो मार्गी कुटिले ।।
श्वानासारिखी एक भुंकती । तोंडे वांकडी कंप सूटती ।
पिसाळले, विष्ठ भक्षिती ।।
हत्ती घोडे बहु मारिले । थोर लोक भूमी काढिले ।
तांति वाहणा बाजीद जाले ।।
ऐसी हे लीळा कळे न कळा । कळा विकळा धाक सकळा ।
थोर थोर म्हणती पळा ।।
मल्लुखान देव मल्लारि । रात्रिभागी चाबुक मारी ।
तोंडे सुजती पैजारांवरी ।।
गर्व जाता ते बराबरी । संतोषता न्याहाल करी ।
दास म्हणे करा चाकरी ।।
४
रामनाम जपतो महादेव । त्याचा अवतारी हा खंडेराव ।।
हळदीची भंडारे उधळिती । तेणे सोन्यारुप्याची भांडारे भरती ।।
मणिमल्लमर्दन देव । एका भावे भजता मार्तंड भैरव ।।
म्हाळसा बाणाई सुंदरी । मध्ये शोभे भूषणमंडित मल्लारि ।।
अखंड रणनवरा त्यासी भंडारे प्रीती । रोकडी प्रचीती जनांमध्ये दाखवी ।।
भक्त कुतरे वाघे अंदु तोडिती । दुर्जनाची तात्काळ होतसे शांति ।।
५
देशोदेशीचा जन उदंड येतो । नाना प्रकारे नवस फेडितो ।
देव त्याचे लळे पाळितो ।।
मार्गी लागता बेडया तुटती । कुलुपे तोंडींची तुटोनि जाती ।
नाना खोडे खिळी निघती ।।
जिव्हा कापिता मागुता बोले । शिरे वाहता उठोनी चाले ।
उदंड ठायी प्रसंग जाले ।।
वांझे लेकुरे, निधन्या धन । भक्ता पाळितो मनापासुन ।
दास म्हणे आनंदघन ।।
महीपति कळेना गति पाहो जाता सामर्थ्य किती |
---------------------------------------
एकनाथ महाराज
1
अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगारा वारी ।
सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ।।
मल्लारिची वारी माझ्या मल्लारिची वारी ।।
इच्छामुरुळीस पाहूं नका पडाल नरकद्वारी ।
बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी ।।
आत्म निवेदन रोडगा निवतील हारोहारी ।
एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी ।।
----------------------------------------
2
वारी वो वारी ।
देई कां गा मल्हारी ।
त्रिपुरारी हरि ।
तुझे वारीचा मी भिकारी ।।
वाहन तुझे घोड्यावरी ।
वरी बैसली म्हाळसा सुंदरी ।
वाघ्या मुरुळी नाचती परोपरी ।
आवडी ऐसी पाहीन जेजुरी ।।
ज्ञान कोटम्बा घेउनी आलो द्वारी ।
बोध भंडार लाविन परोपरी ।।
एका जनार्दनी विनवी श्रीहरि ।
वारी देऊनी प्रसन्न मल्हारी ।।
-----------------------------------------------------
सगुण गुण माया ।
आली कोल्हाटीण खेळाया ॥ धृ. ॥
प्रपंचाचा रोविला वेळु । चहुं शून्याचा मांडला खेळु ।
ब्रह्माविष्णु जयाचे बाळु । लागती पाया ॥ १ ॥
आला गडे निर्गुण कोल्हाटी । सोहं शब्दे ढोलगे पिटी ।
चैतन्याची उघडून दृष्टी । चला जाऊ पहाया ॥ २ ॥
कोल्हाटीण मारिती ऎशी उडी । एकवीस स्वर्गावरती माडी ।
देखे द्वार खिडकी उघडी । अगाध माया ॥ ३ ॥
कोल्हाटीण बसली असे डोळा । जाणे गुरु पुत्र विरळा ।
एका जनार्दनी लीळा । जाती वर्णाया ॥ ४ ॥
सदानंदाचा यळकोट