खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव
जेजुरी पर्यटन
श्रीक्षेत्र जेजुरी म्हणजे पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. मंदिरे, तलाव व ऐतिहासिक वास्तू यांचा खजिनाच जेजुरी परिसरामध्ये पहावयास मिळतो त्याची हि झलक.........
nice temple and ,well maintained
Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!
its nice....!!!
Very good temple and there facilities
Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted
Comments for this guestbook have been disabled.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव
पाण्याने तुडुंब भरलेला
तलाव, मावळतीला निघालेला सूर्य आणि पश्चिमेकडून येणा-या सोनेरी किरणांनी
न्हाऊन निघालेला जेजुरगड, पक्षांचा किलबिलाट असे मनाला प्रसन्नता देणारे विहंगम दृश्य मनाचा थकवा नाहीसा करते. भाविक
आणि पर्यटकांच्या दृष्टीने जेजुरीतील सायंकाळ निवांत घालविण्यासाठी अतिशय
रमणीय ठिकाण म्हणून ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलावाचा.
श्रीक्षेत्र जेजुरी
नगररचनेचा, जल व्यवस्थापनेतील महत्वाचा दुवा म्हणजे अठरा एकर क्षेत्रावर
व्यापलेला
होळकर तलाव, हा जलसाठा म्हणजे जेजुरी गावाच्या दृष्टीने अमृतकुंभच आहे.
टेकडीच्या सोंडेवर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या
तलावावर जेजुरी गावाचा पाणी पुरवठा वर्षानुवर्षे अवलंबून होता, आणि आजही या
तलावातून झीरपणा-या
पाण्यावर परिसरातील विहिरी व कूपनलिकांना पाण्याची कमतरता कधीच भासत नाही.
जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेकडील डोंगरातून ओढ्याद्वारे वाहत येणा-या पाण्यावर इसवी सन १७७० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हा तलाव व जननी तीर्थ बांधले, त्या सोबतच तलावाच्या पूर्व-उत्तर बाजूस देवपूजेसाठी फुलबाग निर्माण केली तर दक्षिण
बाजूस चिंचेच्या झाडांची बाग तयार केली ज्याचा उपयोग यात्रा काळातील
भाविकांच्या निवा-यासाठी होतो. संपूर्ण
दगडी बांधकाम असलेल्या तलावाला पाच ठिकाणांवरून खाली उतरण्यासाठी बांधीव
पाय-या आहेत तर दोन ठिकाणी मोटेद्वारे पाणी उपसण्याची थारोळी
आहेत.तलावाच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचे नियंत्रण
करणा-या दटट्याची व्यवस्था आहे, तलावाचे पाणी भूमिगत नळाद्वारे गावातील तीन हौदाना
व गायमुखाला पुरविले जात होते.
मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर
सुभेदार मल्हारराव होळकर म्हणजे क-हेपठारावर वाढलेले व रेवा तीरावर बहरलेल रांगडे व्यक्तिमत्व.शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार करणा-या मराठे शाहीतील एक प्रमुख सरदार म्हणून मल्हाररावांनी नावलौकिक तर मिळवलाच याउपर उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणात दरारा निर्माण केला होता. माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर येणा-या उत्पन्नातून जेजुरीच्या कुलस्वामी मल्हारी मार्तंडाच्या मंदिराचे भव्य बांधकाम करण्याचा घाट घातला व हे काम वर्षानुवर्षे चालूच होते अशा लढवय्या वीर मल्हाररावांचा मृत्यू मोहिमेवर असताना आलमपूर येथे २० मे १७६६ रोजी झाला. त्यांच्या पत्नी द्वारकाबाई व बनाबाई सती गेल्या.
ज्यागावी त्यांचा मृत्यू झाला त्या आलमपूरचे नाव बदलून
मल्हारनगर असे ठेवण्यात आले. तेथे मल्हाररावांची छत्री बांधण्यात आली व
समोरच मार्तंडाचे मंदिर बांधण्यात आले. परंतु मल्हारराव होळकरांचे
जेजुरीविषयी असलेल्या प्रेमापोटी त्यांच्या गादीचे तिसरे वारस तुकोजी होळकर
यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मार्गदर्शना खाली जेजुरी येथे
मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर उभे केले.
पूर्वाभिमुख असलेल्या छत्री मंदिराचे बांधकाम अतिशय प्रमाणबद्ध व रेखीव
असून मंदिराचे मंडप व गर्भगृह असे दोन प्राकार आहेत पैकी मंडपाचे छत
घुमटाकार आहे व त्यावर आतील बाजूने चित्रे रंगविली आहेत. मंडपामध्ये
वातानुविजनासाठी सुरेख कोरीव काम केलेल्या दगडी खिडक्या आहेत. गर्भगृहात
लाकडी मेघडंबरीमध्ये खालील बाजूस संगमरवरी शिवलिंग असून मागील कट्ट्यावर
मध्यभागी सुभेदार मल्हारराव होळकरांची संगमरवरी बैठी मूर्ती आहे,तर
त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नी गौतमाबाई व बनाबाई यांच्या मूर्ती
आहेत.
मंदिरासमोर चौथ-यावर कोरीव नंदीचे भव्य शिल्प आहे, नंदीच्या गळ्यातील घंटा, साखळी व झुलीवरील नक्षी सुबकरित्या कोरलेली आहे.
लवथळेश्वर मंदिर
जेजुरी गावठाणा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेले लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे, दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय येवू नये असे वाटत होते, ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर, दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव-शाकिनी-डाकिनी-भूत-पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला, तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' ही आरती स्फुरल्याचे सांगितले जाते.
मंदिर जमिनीपासून खाली आतमध्ये असल्याने बाहेरून सहजपणे लक्षात येत नाही.मंदिरामध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडीलबाजूने पाच सहा पाय-या आहेत त्यांच्या उजव्या अंगावर एक अस्पष्ट सात ओळींचा शिलालेख दिसतो, त्यावर शके १५३० हे साल दिले आहे. मूळ मंदिर उत्तराभिमुख आहे प्रवेश द्वाराबाहेर कोनाड्यांमध्ये देव देवतांच्या मूर्ती आढळतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हातास गणेश मूर्ती व नाग मूर्ती आहे.त्याच्या शेजारीच पश्चिमेकडे एक दरवाजा असून तो 'लवतीर्थ' मध्ये जाण्या चा मार्ग आहे. गणपतीच्या समोरच पाठमोरा मोठा नंदी आहे. नंदी समोर मुख्य गर्भगृहात अडीच फुट उंचीचा जाण्याचा मार्ग आहे. मुख्य गर्भगृह दोन ते तीनच लोक मावू शकतील एवढे अतिशय छोटे असून तेथे लवा ऋषींनी स्थापित केलेले सुंदर शिवलिंग आहे.
पेशवे तलाव
पेशवाई मध्ये जेजुरीचा, पुण्याप्रमाणेच कायापालट झाला, होळकरांचे त्यातील योगदान मोठे आहेच, परंतु त्याबरोबरच अनेक सरदार घराण्यांनी सुद्धा याला हातभार लावला. अखेरचे पेशवे बाजीराव रघुनाथ उर्फ दुसरा बाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जी काही थोडीफार समाजोपयोगी कार्ये केली त्यापैकीच एक म्हणजे खंडोबा मंदिराच्या अग्नेयेकडील पायथ्याला रमणा परिसरातील ओढ्यावर पाणी साठवण्याचा तलाव बांधला. या तलावाचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वापरण्याची व्यवस्था केलेली आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता खूप मोठी आहे परंतु 'पाणी संकलन क्षेत्र' मर्यादित असल्याने तलाव पूर्ण क्षमतेने कधीही भरत नाही. या तलावाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे पूर्वेकडील बांधकामामध्ये पाणी वितरण करण्यासाठी दट्ट्याची व्यवस्था आहे व प्रथम दर्शनी सहज लक्षात न येणारे बल्लाळेश्वर मंदिर या भिंतीच्या पोटात आहे. तलावाच्या मध्यभागी एक गोलाकार विहीर आहे तलाव जरी आटला तरी यामध्ये भरपूर पाणी असते, मध्यंतरी दुष्काळी परिस्तिथी मध्ये जेजुर गडावर येथूनच पाणी पुरविले जात होते.
शंकरेश्वर
जेजुरी गावाच्या नैऋत्येला साकुर्डे नामक गाव आहे तेथून पुढे जायाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये धावडदरा मोरदरा व देवदरा निसर्गरम्य अशा द-या आहेत. त्यापैकीच देवद-या मध्ये शंकरेश्वर रामेश्वर व बोंबलेश्वर ही स्थाने आहेत. यापैकी शंकरेश्वराचे मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे हे दक्षिणाभिमुख आहे व आतील शिवलिंगाची पर्णिका पूर्वेकडे आहे असे शिवमंदिर एकमेवद्वितीय असावे असे वाटते. सप्तऋषींनी मणीचूल पर्वतावरील आपला कुटुंब कबिला येथे आणून ठेवला होता असे मार्तंड विजय ग्रंथ सांगतो. त्यातील एका टेकडीवर एक गणेश मंदिर आहे त्यालाच बोंबलेश्वर म्हणतात.
हुतात्मा स्मारक
मा.ए.आर.अंतुले, मुख्यमंत्री पदी असताना महाराष्ट्र शासनाने, १९८३ साली एक
महत्वपूर्ण निर्णय घेतला, स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा झालेल्या
महापुरुषांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या गावी अथवा त्यांना वीरमरण ज्याठिकाणी आले तेथे हुतात्मा स्मारक उभारायचे. महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमांतर्गत श्रीक्षेत्र जेजुरी येथे गावातून जाणा-या आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गालगत क्रांतिवीर हरी मकाजी नाईक यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. रामोशी समाजातील उपेक्षित राहिलेल्या क्रांतीवीराच्या स्मृतींना उजळा मिळण्यास या स्मारकामुळे काही अंशी हातभार लागला. आता पालिकेने याठिकाणी बाग तयार केली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात स्मारकाची रंगरंगोटी झाली, नव्याने काही दिवे लागले.
क्रांती ज्योतीचा स्तंभ आणि अष्टकोनी सभागृह असे या वस्तूचे स्वरूप असून सभोवताली हिरवळ आणि झाडे मन प्रसन्न करतात.
येथे हुतात्म्यांच्या स्मृती जागवणारे कोणतेही
कार्यक्रम होत नाहीत. वास्तू टिकवून ठेवण्याचा
उपचार पाळण्यात आजवर सा-यांनी धन्यता बाळगल्याने या स्मारकांची पडझड
अद्याप झालेली नाही. भलेबुरे प्रसंग झेलत रौप्यमहोत्सव पूर्ण करणारे हे
स्मारक देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवणारे केंद्र बनू शकले नाही.
याला केवळ प्रशासनच नाही तर सारेच आपण जबाबदार आहेत.
श्रीखंडेरायाच्या दर्शनासाठी येणा-या भाविक भक्तांनी आणि पर्यटकांनी आवर्जून या हुतात्मा स्मारकास भेट देऊन दोन घटका वेळ घालविण्यास काहीच हरकत नाही.
हेगडी प्रधान
मणीसूर व मल्लासूर या दैत्यांच्या युद्धावेळी मार्तंड भैरवाने विष्णुना आपले प्रधान म्हणून नेमले होते व मणीसूर दैत्य धारातीर्थी पडल्यानंतर त्याने केलेल्या स्तुतीमुळे मार्तंड भैरव प्रसन्न झाले व त्यांनी विष्णुना देवसेनेतर्फे मल्लासूराकडे शिष्टाई करण्यासाठी पाठविले होते. विष्णूनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही व पुढे युद्धामध्ये मार्तंड भैरवाचे हातून मल्लासूराचा संहार झाला. विष्णूंचे अर्थात हेगडी प्रधानाचे मंदिर जेजुरगडावरील पायरी मार्गाच्या मध्यावर लागते.मंदिर साध्या बांधणीचे विना कळसाचे दगडामध्ये बांधलेले आहे.
या
मंदिरामध्ये विष्णूंच्या दोन मूर्ती आहेत त्यावरून अनेकांना वाटते हेगडे व
प्रधान दोन स्वतंत्र असावेत परंतु सत्यात प्रधान या शब्दाचे कानडी रूप
म्हणजे हेगडे होय. ज्याप्रमाणे चांगभलं हे एकाच अर्थाच्या दोन शब्दांचे
एकत्रीकरण करून त्यांचा एकच शब्द रूढ झाला आहे तसेच हेगडे + प्रधान यांचे
बाबतीत हेगडी प्रधान हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. श्रीखंडोबा म्हाळसाईचे
दर्शन घेण्यापूर्वी हेगडी प्रधानाचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते.
यशवंतराव
गडकिल्ल्यांच्या उभारणी करताना त्यांच्या रक्षणासाठी यशवंतरावची निर्मिती केलेली असते तसेच जेजुर गडावरील महाद्वाराशेजारी तट बंदीत उभे असलेले महत्वाचे ठिकाण म्हणजे यशवंतराव. येथे वरच्या बाजूला दोन इंच व्यासाचे एक छिद्र आहे त्याविषयी आख्यायिका सांगितली जाते, औरंगझेबाने जेजुर गडावर स्वारी केल्यानंतर या छिद्रातून मोठे भुंगे बाहेर पडले व त्यांनी मोगलांवर हल्ला चढविला होता, तेव्हा औरंगझेबाने श्रीखंडोबाची माफी मागितली व सव्वा लाखाचा भुंगा वाहिला. या संदर्भातील रामदास स्वामींच्या एका पदामध्ये याचे वर्णन आलेले आहे, ते असे
गुप्त मल्लेश्वर ( गुप्तलिंग )
मार्तंड भैरवाने बाणाई सोबत विवाह केला व चोरून तिला जेजुरगडावर तळघरामध्ये आणून ठेविले होते.तेथून ते महाशिवरात्रीला प्रकट झाले.अशी कथा गुप्त मल्लेश्वराविषयी "मार्तंड विजय" ग्रंथात सांगितली आहे. मुख्य मंदिरातील गर्भगृहामध्ये उजवीकडे व डावीकडे दोन खोल्या आहेत त्यापैकी डावीकडील खोलीत देवाचे शेजघर आहे तर उजवीकडील खोली बाहेरून रिकामी दिसते परंतु या खोलीमध्ये तळघर असून या तळघरामध्ये श्रीखंडोबा व बाणाईचे स्वयंभू लिंग आहे. हे गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्री उत्सवामध्ये उघडले जाते एरवी ते बंदच असते. असेच एक लिंग शिखरामध्ये आहे तेसुद्धा महाशिवरात्रीलाच उघडते.
महाशिवरात्रीला जेजुरी येथे आल्यानंतर पाताळलोक, भूलोक व स्वर्गलोक या त्रैलोक्यामध्ये व्यापलेल्या परमेश्वराचे लिंगरूपाने दर्शन होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सदानंदाचा यळकोट