Android Phone साठी

"जय मल्हार"

मोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.

लोककथा

श्रीखंडोबा हे सर्व सामान्य जणांचे दैवत असल्याने, या दैवाताच्या अनेक लोककथा    लोकप्रिय आहेत. एखादी घटना किंवा प्रसंग लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी आणि त्याचे महत्व वाढविण्यासाठी ज्या कथानुरूप गोष्टींची निर्मिती होते ती लोककथा. यांचे कोणत्याही प्रकारचे निश्चित पुरावे नसतात, याचे कुठलेही लिखाण नसते, आणि यामध्ये सांगणारा आपल्या सोयीप्रमाणे त्यामध्ये बदल करतो त्यामुळे मूळ ढाच्याबरोबरच अनेक उपकथा निर्माण होत असतात.अशा श्रीखंडोबा संदर्भातील काही लोककथा.....

Displaying all 7 comments

सदानंदाचा यळकोट

खुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....
राजेंद्र भवर ,कोपरगाव

nice temple and ,well maintained

Sadanandancha yalkot
Yalkot yalkot jai malhar
Prasanna devasthan
Prabhavshali history
Ya website varil mahiti khup changli aahe
Khanderayachya bhaktansathi hi changli goshta aahe
Thank you to all team
And god bless you !!!

its nice....!!!

Very good temple and there facilities

Yelkot yelkot jai malhar.
Mahiti sathi khup khup chanted

Comments for this guestbook have been disabled.

खैरे पाटलांची भक्ती

Placeholder Imageसुपे नामक गावातील खैरे पाटील खंडोबा देवाचे भोळे भक्त अनेक दिवस नित्य नेमाने क-हे पठारावरील जायाद्रीवासी खंडेरायाची सेवा करीत असत. कालांतराने वय वाढल्यामुळे सेवेमध्ये अनियमितता येण्याची चिंता खैरे पाटलांच्या मनाला सलू लागली, भक्ताच्या मानतील चिंता ओळखणा-या मल्हारी मार्तंडाने त्यांना दृष्टांत दिला व सांगितले "तू पुढे चाल मी तुझ्या पाठीशी आहे,तुझ्यासारख्या अबालवृद्धांसाठी मी तुझ्या सोबत तुझ्या गावात येत आहे फक्त माझी एकच अट आहे जोवर माझ्यावरचा विश्वास तुझ्या सोबत आहे तोवर मी तुझी सोबत करीन ज्याठिकाणी मनोनिश्चय ढळेल तेथे मी वास्तव्य करेन."
परमेश्वराने सांगितल्या प्रमाणे खैरे पाटील चालू लागले डोंगरावरून खाच खळग्यातून उतरत डोंगराच्या सोंडेवर दम घेण्यासाठी थांबले असता देव खरेच आपल्या पाठीशी आहेत अशी शंका मनात आली व पाठीमागे वळून पहिले असता त्याठिकाणी दोन स्वयंभू लिंगे दिसली व त्यांना देवाने घातलेली अट आठविली पण आता खूप उशीर झाला होता, देवाचे दर्शन घेऊन उत्साहाने आपला नित्य नेम अखेरपर्यंत चालू ठेवला. आजही खैरे पाटील लोकगीतांमधून तसेच वाघ्या मुरुळी यांच्या सादरीकरनातून सदैव भाविक भक्तांच्या मनामध्ये घर करून आहेत. भक्ती आणि श्रद्धा या दोन्हीचा संगम असलेले खैरे पाटलांच्या घराण्याला माघ पौर्णिमेच्या वेळी शिखर काठीचा मान असतो.

---ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महारज की जय ll ll जयमल्हार ll---


श्रीकृष्ण कथा

एके दिवशी प्रातः काळी बाळकृष्ण उठून यशोदे जवळ दुध प्यायला मागू लागला तेव्हा यशोदा म्हणाली,"आज रविवार आहे, आज खंडेरायास नैवेद्य दाखविल्या शिवाय ते कोणालाही द्यावयाचे नाही .तसे केले तर दैवत आपल्यावर कोपेल". हे ऐकून कृष्णाने विचारले "खंडेराया कोण आहे ?" यशोदा म्हणाली देव्हा-यात आहे तेथे जाऊन पहा. ते ऐकताच श्री कृष्ण देव्हा-या जवळ गेला त्याने खंडोबा सह सर्व देवांस दोरीने बांधले. मग तो आईला म्हणाला आई देवाची एवढे मोठे सत्व सांगतेस पण हे सर्व देव या दोरीने मी बांधून ठेवले आहे तुझा देव आता मला काय करणार आहे असे म्हणून श्री कृष्णाने सर्व दुध नैवेद्य दाखविण्यापुर्वीच पिऊन टाकले. दुस-या दिवशी श्री कृष्ण झोपेतून उठताच रडू लागला तो म्हणाला "आई माझी मान वाकडी झाली आहे. मला कडेवर घे." यावर यशोदेने कडेवर घेतले.आणि ती म्हणाली कृष्णा काल नैवेद्य न दाखवताच तु दुध प्यायलास, खंडेरायाची थट्टा केलीस म्हणून त्यचा तुझ्यावर कोप झाला आहे. आता चल देवाकडे असे म्हणून तिने कृष्णास देव घरात आणले आणि खंडेरायाचा भंडारा कृष्णाच्या कपाळी लावला. त्यावेळी खंडोबा तेथे प्रकट झाले. आणि यशोदेस म्हणाले यशोदे तुझे पुण्य अपार म्हणून हा परमेश्वर तुझे घरी नांदत आहे. आम्ही सर्व दैवते त्याच्या अंगभूत आहोत, याला नैवेद्य दाखविलास म्हणजे आम्ही सर्व तृप्त होऊ.असे बोलून खंडेराया गुप्त झाले.  

हरिविजय अध्याय क्रमांक नऊ. १९२-२०८.

---ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महारज की जय ll ll जयमल्हार ll ---


बादशाह औरंगजेब व मल्हारी मार्तंड

मोगल बादशाह औरंगजेब, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सर्व शक्तीनिशी दक्षिण स्वारीवर आला असताना गड किल्ल्यांबरोबरच मादिरांवर त्याची वक्रदृष्टी पडत होती. असेच सुपे परगण्यात आला असताना भुलेश्वर मंदिरातील मूर्ती भंजन केल्यानंतर तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ल चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रूपये खंडोबास नजर केले. देवास सव्वा लाखाचा हिरेमाणके जडित भुंगा देवास अर्पण केला.मल्हारी मार्तंडाने अजामत (करामत) दाखविल्याने अजामतखान तसेच मलूखान नावाने जयजयकार करीत वारी मागितली. आजही मल्हार भक्त त्याप्रसंगाची आठवण म्हणून मलूखानाची वारी मागतात.

---ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महारज की जय ll ll जयमल्हार ll---


भायाची भक्ती

Placeholder Imageएकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजिक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधा-यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडिलधारे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कु-हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कु-हाड रूतली आणि त्यातून रक्तदूधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले.

वरिल लोककथा पेशवे दरबारात सन १७५०  मांडण्यात आली होती.

---ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महारज की जय ll ll जयमल्हार ll---


Bookmark and Share